नारायण राणेंचा फोटो Tweet करत नितेश राणे म्हणाले 'अब आयेगा मजा'

नारायण राणेंचा फोटो Tweet करत नितेश राणे म्हणाले 'अब आयेगा मजा'

भाजप सरकार स्थापन करणार. त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नारायण राणे यांनी माध्यमांना दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात कलम 356 लागू करण्याची शिफारस केल्यानंतर त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. त्यात आता नितेश राणेंनी ट्वीट करत 'अब आयेगा मजा' असं म्हटलं आहे. सगळ्या विषेश म्हणजे असं म्हणत नारायण राणे यांचा फोटो त्यांनी नितेश राणेंनी ट्वीट केला आहे.

अशा पद्धतीचं ट्वीट करत नितेश राणे यांना काय सुचवायचं आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पण भाजप सरकार स्थापन करणार. त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नारायण राणे यांनी माध्यमांना दिली आहे. नारायण राणे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना जे काही करत आहे नैतिकतेला धरून नाही. निवडणुकीपूर्वी युती झाली होती. आता हे नैतिकतेला धरून नाही. युती केली होती हेही वचन होतं. काँग्रेस -राष्ट्रवादीचे नेते तोंडावर एक बोलता आणि मागे एक बोलतात. सेनेला ते उल्लू बनवत आहे, अशी टीका राणेंनी केली. तसंच शिवसेना ही काँग्रेससोबत जाणार नाही, असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.

इतर बातम्या - नारायण राणेंच्या 'त्या' विधानावर भाजपने झटकला हात!

भाजप सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सरकार स्थापन करण्यासाठी जे जे काही करत येईल ते ते करणार, असं राणेंनी स्पष्टपणे सांगितलं. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू  झाली ही दुर्दैवी बाब आहे. फडणवीस यांनी सरकार स्थापन करण्याच्या कामाला लागा असं मला सांगितलं आहे. आम्ही जेव्हा राज्यपालांकडे जावू तेव्हा खाली हाताने जाणार नाही, आमच्याकडे 145 जागांचं बहुमत असेल, असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.

सेना आणि आघाडीला हवा चर्चेला वेळ!

दरम्यान, शिवसेना आणि आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत ठोस असा कोणताही निर्णय झाला नाही. परंतु, उद्धव ठाकरे आणि आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येण्याबद्दल संकेत दिले आहे. मात्र, काही मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ लागेल, असं स्पष्ट केलं आहे.

BIG BREAKING: मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्ट संकेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2019 09:58 PM IST

ताज्या बातम्या