उद्धव ठाकरेंचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यासाठी नितेश राणेंचं पत्र

उद्धव ठाकरेंचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यासाठी नितेश राणेंचं पत्र

या पत्राच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिवसेना विरूद्ध राणे असा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

  • Share this:

15 जून : आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेऊ, अशी धमकी वारंवार देणाऱ्या शिवसेनेची नितेश राणे यांच्याकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. आम्ही राज्य सरकारचा पाठिंबा काढू, हे वाक्य सर्वाधिक बोलण्याचा विक्रम केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. स्वत: ट्विट करून नितेश राणे यांनी तशी माहितीही दिली आहे.

नितेश राणे एवढ्यावरच थांबले नसून, त्यांनी गिनीज वर्ल्डस रेकॉर्डकडे तसे रितसर पत्रही पाठवले आहे. या पत्रात आपण जागतिक विक्रमासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची नोंदणी करू इच्छित असल्याचे नितेश यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे हे भारतातील महाराष्ट्र या राज्यात असलेल्या शिवसेना या प्रादेशिक पक्षाचे प्रमुख आहेत. आम्ही त्यांच्या नावे, 'शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढेल', हे वाक्य सर्वात जास्तवेळा उच्चारल्याबद्दल जागतिक विक्रमाची नोंद करू इच्छित आहोत. गिनीज बुकात नोंद होणारा हा पहिलाच अशा प्रकारचा विक्रम असेल. माझ्या या पत्रालाच नोंदणीसाठीचा अर्ज समजण्यात यावे, असं पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, नितेश राणे यांच्या पत्रामुळवे पुन्हा एकदा शिवसेना विरूद्ध नितेश राणे असा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

First published: June 15, 2017, 1:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading