मुलगा आजोबांच्या पक्षात, मी मात्र वेटिंगवरच - नितेश राणे

मुलगा आजोबांच्या पक्षात, मी मात्र वेटिंगवरच - नितेश राणे

नितेश राणे या पक्षात कधी प्रवेश करणार याबाबत मात्र नारायण राणे यांनी काहीही माहिती देणं टाळलं आहे.

  • Share this:

2 ऑक्टोबर: नारायण राणे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन  नवीन पक्षाची घोषणा केली आहे. या पक्षात नितेश राणे यांचा मुलगा सहभागी झाला आहे .पण नीतेश राणे  मात्र काही या पक्षाचा भाग झालेले नाहीत. तेव्हा मुलगा आजोबांच्या पक्षात मी मात्र वेटिंगवर असं ट्विट नीतेश राणेने केलं आहे.

नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केल्यानंतर, आता कार्यकर्त्यांची जमवाजमव करुन पक्षबांधणी सुरु झाली. मात्र या पक्षात एक चिमुकल्या कार्यकर्त्याने प्रवेश केला आहे. तो चिमुकला म्हणजे आमदार नितेश राणेंचा मुलगा होय. नीतेश राणे या पक्षात कधी प्रवेश करणार याबाबत मात्र नारायण राणे यांनी काहीही माहिती  देणं टाळलं आहे. पत्रकारांनी विचारलं असता ज्योतिषाला विचारून सांगतो असं राणे म्हणाले होतो. तसंच साहेबांची आज्ञा झाली की पक्षात प्रवेश करणार असं वक्तव्य नीतेश  राणे यांनी केलं  होतं.

आता नारायण राणे यांचे सुपुत्र महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षात कधी प्रवेश करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 10:09 AM IST

ताज्या बातम्या