LIVE NOW

Nisarga Cyclon : चक्रीवादळाच्या तडाख्यात 3 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यात वीज गायब

रात्री निसर्गचा जोर ओसरणार असून सकळपर्यंत हे वादळ शांत होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या वादळाचे सर्व LIVE अपडेट्स जाणून घ्या.

Lokmat.news18.com | June 4, 2020, 12:12 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated June 4, 2020
auto-refresh

Highlights

7:19 pm (IST)

निसर्ग चक्रीवादळाचा पहिला बळी अलिबाग मध्ये गेलाय . अलिबाग मधल्या उमटे गावातल्या 58 वर्षांच्या दशरथ वाघमारे यांच्यावर वीजेचा खांब पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय . जोराच्या वाऱ्यांमुळे वाघमारे यांच्यावर वीजेचा खांब कोसळला आणि त्यात ते जखमी झाले . त्याना उपचारासाठी रुग्णालयत नेत असताना त्यांचा मृत्यु झाला.

7:06 pm (IST)

चक्रीवादळामुळे आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीजेचा खांब कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. अलिबाग जवळच्या उमटे खेड्यात ही घटना घडल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितलं.

5:58 pm (IST)

चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर अलीबागमध्ये आता पडलेली झाडं हटविण्याचं काम सुरू आहे.


5:22 pm (IST)

चक्रीवादळाचा धोका टळला, मुंबईत अद्याप जीवित हानी नाही. रात्री ‘निर्सग’चा जोर कमी होणार आणि सकाळपर्यंत हे वादळ शांत होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

3:59 pm (IST)
पहिल्या अर्ध्या तासात 'निसर्ग'चं रौद्र रूप, हे 15 PHOTOS दाखवतायत विध्वंसक चित्र
3:58 pm (IST)
PHOTOS : पुण्यात 'निसर्ग'चं थैमान! कुठे उडाली छतावरील पत्रे तर कुठे उन्मळून पडली झाडं पाहा PHOTO– News18 Lokmat
3:57 pm (IST)
मुंबईचा धोका टळला; चक्रीवादळाची दिशा आता पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक मार्गे | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News
2:46 pm (IST)

निसर्ग चक्रीवादळाचं रायगडमध्ये थैमान, इमारतीवर असलेले पत्रे उडाले.

 


2:43 pm (IST)

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये अलर्ट, उरण मध्ये देखील NDRF ची तुकडी दाखल...दरम्यान तासी 120 च्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता

 

2:41 pm (IST)
समुद्रातून जमिनीकडे घोंघावणाऱ्या चक्रीवादळाच्या डोळा कॅमेऱ्यात कैद! पहिल्यांदाच समोर आला VIDEO
Load More
मुंबई, 03 जून : निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या किनारा पार करून पुढे गेलं आहे. त्यामुळे मुंबईचा मोठा धोका टळला आहे. सोसाट्याचा वार, झाडांची पडझड आणि पाऊस असं त्याचं स्वरुप होतं. रात्री निसर्गचा जोर ओसरणार असून सकळपर्यंत हे वादळ शांत होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या वादळात राज्यात तीन जणांचा मृत्यू झाला. निसर्ग चक्रीवादळाचा पहिला बळी अलिबाग मध्ये गेलाय . अलिबाग मधल्या उमटे गावातल्या 58 वर्षांच्या दशरथ वाघमारे यांच्यावर वीजेचा खांब पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय . जोराच्या वाऱ्यांमुळे वाघमारे यांच्यावर वीजेचा खांब कोसळला आणि त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयत नेत असताना त्यांचा मृत्यु झाला. तर दोन मृत्यू पुणे जिल्ह्यात झाले. पालघर, ठाणे, पुणे आणि रायगड या जिल्ह्यामध्ये वीजेचे खांब कोसळल्याने वीज गेली आहे.  कोसळलेले खांब दुरूस्त करण्यासाठी वेळ लागणार असून त्यामुळे वीज पुरवढा सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.