नवी दिल्ली, 20 मार्च : अखेर 7 वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळाला आहे. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी चारही आरोपींना फाशी देण्यात आली आहे. चारही दोषींना 20 मार्च 2020 रोजी पहाटे 5.30 वाजता फाशी दिली गेली. फाशी देण्यापूर्वी अर्धा तास हे खूप महत्वाचे होते. यावेळी दोषींनी स्वत: चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. ते ओरडले, उशीरापर्यंत हँगिंग रुममध्ये बसले होते. पण शेवटी संपूर्ण देश त्यांच्या मृत्यूची वाट पाहत होता.
चौघांनाही एकत्र दिली फाशी
जेल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चारही आरोपींना एकत्र फाशी देण्यात आली. यासाठी तुरूंग क्रमांक -3 च्या फाशी सेलमध्ये चौघांना फासावर लटकवलं. चारहींना फाशी देण्यासाठी 60 हजार रुपये फाशीची शिक्षा निश्चित करण्यात आली होती, ही किम्मत फक्त फाशी देणाऱ्यालाच मिळेल.
3.15 आरोपींना झोपेतून उठवलं
शुक्रवारी पहाटे 3.15 वाजता चौघांनाही त्यांच्या कक्षातून उठवण्यात आलं, मात्र चौघांपैकी कोणीही झोपलं नाही. यानंतर त्यांना सकाळी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आंघोळ करण्यास सांगण्यात आलं. त्यांच्यासाठी चहा मागवला गेला आणि नंतर शेवटची इच्छा विचारण्यात आली. सेलमधून बाहेर आणण्यापूर्वी त्या चौघांना पांढरा कुर्ता-पायजामा परिधान केला होता. चौघांचेही हात मागे बांधले होते. यावेळी दोन्ही दोषींनी हात बांधण्यास नकार दिला होता, परंतु त्यांचं ऐकण्यात आलं नाही.
एक दोषी फाशीच्या घरात पडून होता
जेव्हा दोषींना फाशीसाठी घेऊन जात होते तेव्हा एकजण घाबरला. तो हँगिंग रुममध्येच झोपला आणि पुढे जाण्यास नकार देऊ लागला. बराच वेळ प्रयत्न करूनही तो आला नाही. या चौघांचे चेहरे काळ्या कपड्याने झाकलेले होते. हँगिंग बोर्डवर टांगण्यापूर्वी त्यांच्या गळ्यात दोरी बांधली गेली. त्याचवेळी त्यांचे दोन्ही पायही बांधले होते. जेणेकरून त्यांचे दोन्ही पाय लटकताना हलू नयेत.
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.