फाशी देताना दोर तुटला तर शिक्षा माफ होते का?

फाशी देताना दोर तुटला तर शिक्षा माफ होते का?

देशभर गाजलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या दोषींना कधी फाशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 डिसेंबर : देशभर गाजलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या दोषींना कधी फाशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. परंतु, जेव्हा एखाद्या आरोपीला फाशी दिली जाते तेव्हा जलाद पूर्णपणे खबरदारी घेत असतो. फाशी देताना फास जर तुटला तर दोषीची शिक्षा माफ होते का?

तिहार जेलमधील फाशीची अंमलबाजवणी करणाऱ्या पवन जल्लादने यावर खुलासा केला आहे. "जेव्हा एखाद्या दोषीची फाशीच्या शिक्षा देण्याचं ठरत तेव्हा संपूर्ण खबरदारी घेतली जात असते. देशात आजपर्यंत तरी फाशी देताना दोरखंड तुटल्यामुळे कुणाचीही शिक्षा रद्द झाल्याची घटना घडली नाही. फाशीची अंमलबजावणीही पूर्णपणे बजावली गेली आहे."

जेव्हा एखाद्या दोषीची फाशी देण्याची तारीख निश्चित केली जाते तेव्हा एक दिवसाआधी आम्हाला जेलमध्ये बोलवण्यात येतं. त्यानंतर त्या आरोपीला फाशी देण्यासाठी प्रक्रिया सुरू होते. फाशी देण्यासाठी काय दोर कोणता वापरायचा? फास कसा बांधायचा?  ज्या दिवशी एका दोषीला फाशी द्यायची असते त्या रात्री आम्हाला झोप येत नाही, असं पवन याने सांगितलं.

जेव्हा दोषीला फाशी द्याची वेळ ठरलेली असते त्याआधी 15 मिनिटांपूर्वी आम्ही फाशीच्या देण्याच्या ठिकाणी पोहोचतो. त्यानंतर दोषीला फासावर लटकावले जाते. कैद्याला जेव्हा जेलमधून आणले जात असते तेव्हा त्याच्या हातात बेड्या असतात किंवा दोरीने हात बांधलेले असतात. दोन पोलीस कर्मचारी त्याला घेऊन येत असतात. जेलपासून ते फाशी देण्याच्या ठिकाणापर्यंत हा वेळ 15 मिनिटांचा असतो. जेव्हा एखाद्या कैद्याला फासापर्यंत आणत असता तेव्हा त्याचे पाय हे थरथरत असतात.

फाशी देत असताना त्या ठिकाणी 4 ते 5 पोलीस कर्मचारी हजर असतात. ते काहीच बोलत नाही, फक्त एकमेकांना इशारे देत असतात. जर कुणी काही बोललं तर दोषी हा भावनाविवश होऊन जातो आणि नको ती मागणी करू लागतो. त्यामुळे त्यावेळी कुणीही बोलत नाही. त्याशिवाय या ठिकाणी जेल अधिक्षक, उप अधिक्षक आणि डॉक्टरांची टीम हजर असते.

जल्लाद पवन कुमारच्या परिवाराने आतापर्यंत 25 जणांना फासावर लटकावलं आहे. विशेष म्हणजे, निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्याचं निश्चित झालं तेव्हा तिहार जेलच्या प्रशासनाने जल्लाद निवडीसाठी उत्तर प्रदेश सरकारला पत्र व्यवहार केला होता.

फाशीच्या शिक्षेमुळे डिप्रेशनमध्ये आहेत निर्भयाचे आरोपी, आता जेवणही घश्याखाली जाईना!

दरम्यान, तिहार कारागृहात (Tihar Jail) निर्भया बलात्कार-खून खटल्यातील चारही दोषी डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचं जेवनही कमी झालं आहे. जेलमधील सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. अक्षय, मुकेश, पवन गुप्ता आणि विनय शर्मा या चार दोषींसह चार-पाच सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून ते स्वत: ला काही नुकसान करून घेऊ नये.

दोषींना फाशी देण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तिहार कारागृह महासंचालक संदीप गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी तुरूंगात भेट दिली. यासाठी या हायप्रोफाईल प्रकरणात कोणतीही माहिती लिक होऊ नये यासाठी तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांच्या फोनवरही पाळत ठेवण्यात आली आहे.

Published by: sachin Salve
First published: December 16, 2019, 7:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading