मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

निर्भयाची आई आशा देवी काँग्रेसकडून केजरीवालांच्या विरोधात लढणार निवडणूक?

निर्भयाची आई आशा देवी काँग्रेसकडून केजरीवालांच्या विरोधात लढणार निवडणूक?

काँग्रेस नेते कीर्ती आझाद यांनीही ट्विट करुन आशा देवीच्या राजकारणात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

काँग्रेस नेते कीर्ती आझाद यांनीही ट्विट करुन आशा देवीच्या राजकारणात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

काँग्रेस नेते कीर्ती आझाद यांनीही ट्विट करुन आशा देवीच्या राजकारणात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

    नवी दिल्ली, 17 जानेवारी : निर्भयाची आई आशा देवी या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांच्याविरुध्द नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसात सुरू आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) निर्भयाची आई आशा देवी यांनी न्यूज 18 इंडियाशी खास बातचीत करताना सांगितले की, त्या निवडणूक लढवणार असल्याची बातमी चुकीची आहे आणि त्यांनी या संदर्भात कोणाशीही बोलणे केलेले नाही. आशा देवी स्पष्टपणे म्हणाल्या की, त्यांना राजकारणात रस नाही, त्यांना फक्त आपल्या मुलीसाठी न्यायाची गरज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निर्भयाची आई केजरीवाल यांच्याविरूद्ध काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात. लवकरच याची घोषणा होऊ शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे. यावर अनेकांनी विश्वास ठेवला आहे कारण काँग्रेस नेते कीर्ती आझाद यांनीही ट्विट करुन आशा देवीच्या राजकारणात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. दुसरीकडे, आशा देवीच्या निवडणुकीबाबत काँग्रेसकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. खरंतर, आशा देवींनी स्पष्टपणे सांगितले आहे की, 'मी राजकारणात येत नाही आणि निवडणुका लढविण्याशी माझा काही संबंध नाही.' निर्भया प्रकरणात फाशी देण्यास उशीर होण्याच्या प्रश्नावर निर्भयाच्या आईनेही अनेक वेळा दिल्ली सरकारवर निशाणा साधला होता. यावेळी आशा देवींनी असेही सांगितले की सरकारला दोषींना वाचवायचे आहे. इतर बातम्या - #BREAKING: अखेर तारीख ठरली! निर्भयाच्या आरोपींना 1 फेब्रुवारीला देणार फाशी CM केजरीवालांनी केली आरोपींना लवकर फाशी देण्याची मागणी दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणावर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, 'दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील सर्व कामे काही तासातच पूर्ण झाली. आम्ही या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही कामात उशीर केला नाही. दोषींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी आमची इच्छा आहे.' राजकारणावर व्यक्त केला संताप यापूर्वी आशा देवी राजकारणावरून खूप रागाच्या भरात दिसल्या होत्या. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशा देवी रडल्या आणि आम्हाला न्याय मिळाला नाही असा आरोप केला होता. सरकारला आमचा त्रास दिसत नाही. प्रत्येकजण बहाण्याने आपली राजकीय भाकरी शिजविण्यात व्यस्त आहे. मुलीच्या मृत्यूशी खेळत आहे. हे षडयंत्र आपण कुठेतरी पाहात आहोत. दोषींना फाशी देणे टाळले जात आहे. इतर बातम्या - परीक्षेतला तणाव दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदी देणार विद्यार्थ्यांना टिप्स
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Arvind kejrewal, Congress, Nirbhaya gang rape case, Pm modi

    पुढील बातम्या