काय म्हणाले होते निर्भयाचे आई-बाबा? निर्भयाच्या आई-वडिलांचे म्हणणे होते की, 'निर्भयाबरोबर झालेल्या बलात्काराला 7 वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत, परंतु अद्याप दोषींना फाशी देण्यात आलेली नाही किंवा आम्हाला न्याय मिळाला नाही. अशा परिस्थितीत निर्भयाच्या आई-वडिलांनाही आशा आहे की 7 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीदरम्यान, माननीय न्यायालय चार दोषींना फाशी देण्याच्या मृत्यूची वॉरंट जारी करेल' अखेर आज कोर्टाने सगळ्यात मोठा निर्णय दिला आहे. इतर बातम्या - JNU : दिल्ली पोलिसांच्या 'या' निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा पेटल भडका काय प्रकरण आहे? हे प्रकरण 16 डिसेंबर 2012 च्या रात्रीचे आहे. चालत्या बसमध्ये एका 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थीनीवर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. नराधम आरोपींनी माणुसकीच्या सर्व मर्यादा सोडून पीडितेवर अत्याचार केले होते. नंतर तिला मृत्यूच्या मार्गी फेकण्यात आले. काही दिवसांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या गुन्ह्यासाठी पवन, मुकेश, अक्षय आणि विनय यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच वेळी, मुख्य आरोपी रामसिंगने खटल्याच्या वेळीच तिहार तुरुंगात आत्महत्या केली, तर आणखी एका अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात 3 वर्षानंतर सोडण्यात आले. निर्भया प्रकरणात चारही आरोपींना एकाच वेळी देणार फाशी, तिहार जेलमध्ये केली तयारी निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार दोषींना एकाच वेळी फाशी देण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीच्या तिहार जेलमध्ये फाशी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आधी एका-एकाला फाशी देण्यात येणार होती पण आता चारही आरोपींना एकाच वेळी फाशी देण्यात येणार आहे. तशा तयारीलाही सुरुवात करण्यात आली आहे. तिहार जेल देशातील असं पहिलं कारागृह आहे, जिथे एकाच वेळी चार आरोपींना फाशी देण्यात येणार आहे. आतापर्यंत इथे फक्त फाशी देण्याकरिता एकच जागा होती, परंतु आता त्यांची संख्या 4 करण्यात आली आहे. तिहार कारागृहाच्या आत फ्रेम्स तयार करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) सोमवारी पूर्ण केलं. हे काम पूर्ण करण्यासाठी जेलमध्ये जेसीबी मशीनदेखील आणण्यात आलं होतं. असं तिहार जेलच्या सूत्रांनी सांगितलं आहे. इतर बातम्या - JNU नंतर अहमदाबादमध्येही राडा, ABVP-NSUI कार्यकर्ते भिडले; VIDEO जेसीबी मशीनच्या सहाय्याने तीन नवीन हँगिंग फ्रेम आणि बोगदे तयार करण्यात आले आहेत. सूत्रांनी सांगितले की, लटक्या फळ्याखाली बोगदा देखील बांधला गेला आहे. या बोगद्यात लटकल्यानंतर मृत कैद्याचा मृतदेह बाहेर काढला जातो. सद्यस्थितीत तीन नवीन हँगिंग बोर्डासमवेत जुनी फळीही बदलण्यात आली आहेत.2012 Delhi gangrape case: A Delhi court issues death warrant against all 4 convicts, execution to be held on 22nd January at 7 am https://t.co/K4JCAM0RJa
— ANI (@ANI) January 7, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.