नवी दिल्ली, 25 जानेवारी : निर्भया गँग बलात्कार प्रकरणात (Nirbhaya Gang Rape Case) दोषी ठरविण्यात आलेल्या विनयच्या वकिलाने न्यायालयात दावा केला आहे की, विनय याला तिहार तुरूंगात (Slow Poison) विष देण्यात आले होते. खरंतर, निर्भया गँग बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या विनयच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान वकील ए.पी. सिंह म्हणाले की, 'त्याच्या क्लायंटला विषबाधा झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण वैद्यकीय अहवाल देण्यात आला नाही. ' मात्र, प्रशासनाने त्यांचा आरोप खोटा ठरविला आहे.
त्याचवेळी एपी सिंह यांनी याचिकेत असेही म्हटले आहे की, तिहार जेल प्रशासनाने अद्याप दोषी पवन, अक्षय आणि विनय यांची कागदपत्रे दिली नाहीत. म्हणूनच, राष्ट्रपतींकडे क्यूरेटिव्ह याचिका आणि दया याचिका पाठविण्यास विलंब होत आहे.
वृत्तसंस्था IANSनुसार, दोषींच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, तुरूंग प्रशासनाला कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात याव्यात, जेणेकरुन शिक्षा भोगलेल्या दोषींना उर्वरित कायदेशीर उपाय (क्यूरिटिव्ह याचिका आणि दया याचिका) देता येतील.
त्वरित आदेश द्या, कोर्टाला सांगितले
सिंग यांनी पतियाळा हाऊस कोर्टासमोर (Patiala House Court) दाखल केलेल्या याचिकेत विनय शर्माच्या दया याचिका आणि विनय शर्मा, पवन कुमार गुप्ता आणि अक्षय कुमार सिंग यांच्या कागदपत्रांची विनंती करण्याबाबत तातडीने कोर्टाचे आदेश मागितले आहेत.
धक्कादायक! ग्राहकाच्या पिझ्झावर थुंकला डिलीव्हरी बॉय, मोजावी लागली भयंकर किंमत
अहवालानुसार, दोषींच्या अर्जात म्हटले आहे की, 'बर्याच विनंत्या करूनही विनय शर्माला दोषी ठरवण्याशी संबंधित कागदपत्रे पुरवली गेली नाहीत. आता संबंधित तुरूंगातील अधीक्षकांकडून पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूरसा अशीच कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
एकाने घेतली फाशी, एक निघाला अल्पवयीन, 4 जणांना देणार फाशी
निर्भया प्रकरणात कोर्टाने नुकताच दोषींवर डेथ वॉरंट जारी करुन 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्याची तारीख निश्चित केली आहे. 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीच्या वसंत विहार येथे फिरत्या बसमध्ये 23 वर्षीय निर्भयावर निर्घृण सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. या बलात्कारात राम सिंह यांच्यासह सहा जणांचा सहभाग होता. यामध्ये मुख्य आरोपीने तुरुंगात आत्महत्या केली होती तर एका अल्पवयीन मुलाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं.
इतर बातम्या - पत्नीचे केस विंचरताना पती करत होता अश्लिल चाळे, व्हायरल VIDEOने अशी घडवली अद्दल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nirbhaya gang rape case