नवी दिल्ली, 25 जानेवारी : निर्भया गँग बलात्कार प्रकरणातील (Nirabhaya Gang Rape Case) चार दोषी विनय, पवन आणि अक्षय ठाकूर यांचा वकिल एपी सिंग (AP Singh) यांनी पुन्हा शुक्रवारी दिल्ली कोर्टात धाव घेतली आहे. तिहार जेल प्रशासनाने (Tihar Jail) अद्याप संबंधित कागदपत्रे दिली नाहीत, अशी याचिका सिंग यांनी दाखल केली आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की निर्भयाचे दोषी फाशीवर जाऊ नये म्हणून सर्व प्रकारच्या युक्ती ते वापरत आहेत.
वृत्तसंस्था IANSनुसार, दोषींच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, तुरूंग प्रशासनाला कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात याव्यात, जेणेकरुन शिक्षा भोगलेल्या दोषींना उर्वरित कायदेशीर उपाय (क्यूरिटिव्ह याचिका आणि दया याचिका) देता येतील.
त्वरित आदेश द्या, कोर्टाला सांगितले
सिंग यांनी पतियाळा हाऊस कोर्टासमोर (Patiala House Court) दाखल केलेल्या याचिकेत विनय शर्माच्या दया याचिका आणि विनय शर्मा, पवन कुमार गुप्ता आणि अक्षय कुमार सिंग यांच्या कागदपत्रांची विनंती करण्याबाबत तातडीने कोर्टाचे आदेश मागितले आहेत.
इतर बातम्या - आईच्या कुशीतलं बाळ घेऊन नाचू लागले तृतीयपंथी, 20 दिवसांच्या बालकाचा मृत्यू
अहवालानुसार, दोषींच्या अर्जात म्हटले आहे की, 'बर्याच विनंत्या करूनही विनय शर्माला दोषी ठरवण्याशी संबंधित कागदपत्रे पुरवली गेली नाहीत. आता संबंधित तुरूंगातील अधीक्षकांकडून पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूरसा अशीच कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
एकाने घेतली फाशी, एक निघाला अल्पवयीन, 4 जणांना देणार फाशी
निर्भया प्रकरणात कोर्टाने नुकताच दोषींवर डेथ वॉरंट जारी करुन 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्याची तारीख निश्चित केली आहे. 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीच्या वसंत विहार येथे फिरत्या बसमध्ये 23 वर्षीय निर्भयावर निर्घृण सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. या बलात्कारात राम सिंह यांच्यासह सहा जणांचा सहभाग होता. यामध्ये मुख्य आरोपीने तुरुंगात आत्महत्या केली होती तर एका अल्पवयीन मुलाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं.
इतर बातम्या - CAA च्या विरोधात वाद चिघळला; 75 वर्षांच्या वृद्धाने भर चौकात स्वत:ला जिवंत जाळलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nirbhaya gang rape case