पहिली क्युरेटिव्ह अर्थात फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. अॅड. ए.पी.सिंह यांच्यामार्फत नराधम विनय शर्मा याने क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. मुकेश व विनयचे वकील ए. पी. सिंह यांनी आपण सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल केल्याचं माध्यामांना सांगितले होते. दुसरीकडे, तिहार तुरुंग प्रशासनाने उत्तर प्रदेश सरकारला पत्र पाठवून मेरठहून जल्लाद मागवला आहे. सन 2012 मध्ये 16 डिसेंबरच्या रात्री धावत्या बसमध्ये सहा जणांनी पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. 29 डिसेंबरला तिचा मृत्यू झाला. सहापैकी एक अल्पवयीन असल्याने तो तीन वर्षांनंतर सुटला. एक दोषी रामसिंह याने तुरुंगात आत्महत्या केली होती. आरोपी अक्षय याने 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये बलात्कार करून तिला मारहाणही केली होती. पवन यानेही निर्भयावर बलात्कार करून तिच्या मित्राला बेदम मारहाण केली होती. मुकेश ही बस चालवत होता. त्यानेही निर्भयासोबत कुकृत्य केले होते. विनय याने निर्भयाचा छळ, बलात्कार, नंतर तिला बसबाहेर फेकले होते.2012 Delhi gang rape case: Supreme Court dismisses curative petitions of two convicts - Vinay Kumar Sharma and Mukesh Singh. pic.twitter.com/9Nsh1AZMaU
— ANI (@ANI) January 14, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nirbhaya gang rape case