INSIDE STORY : फाशीच्या काही तासांआधी निर्भयाचे मारेकरी हादरले, जेलमध्ये ढसाढसा रडले

INSIDE STORY : फाशीच्या काही तासांआधी निर्भयाचे मारेकरी हादरले, जेलमध्ये ढसाढसा रडले

हे चौघेही जेलमध्ये आत्महत्येचा बनाव करून फाशीच्या शिक्षेपासून वाचण्याचा प्रयत्न करू शकता, अशी भीती प्रशासनाला आहे.

  • Share this:

 

नवी दिल्ली, 19 मार्च : देशाला हादरावून सोडणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना अवघ्या काही तासांमध्ये फासावर लटकवले जाणार आहे. मृत्यू समोर पाहून निर्भयाच्या चारही दोषींना आता रडू कोसळलं आहे.

निर्भयाच्या मारेकऱ्यांनी फाशीच्या शिक्षेपासून बचावसाठी आटोकात प्रयत्न केला. पण, सर्वोच्च न्यायालयांनी याचिका फेटाळून लावल्यामुळे चौघांना फासावर लटकवणार हे आता निश्चित झाले आहे. फाशीची प्रक्रिया 20 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजता सुरू होणार आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींवर जेल प्रशासन नजर ठेवून आहे. उद्या पहाटे फासावर लटकवले जाणार या भीतीने चौघेही प्रचंड अस्वस्थ आहे. चौघेही आपआपल्या जेलमध्ये रडत होते. या चौघांना विशेष सुरक्षेत ठेवले असून पुढील काही तास त्यांच्यावर देखरेख असणार आहे.

हे चौघेही जेलमध्ये आत्महत्येचा बनाव करून फाशीच्या शिक्षेपासून वाचण्याचा प्रयत्न करू शकता, अशी भीती प्रशासनाला आहे. त्यामुळे एक सेंकद सुद्धा जेल कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्यावर नजर दूर करत नाहीये.

तिहार जेल प्रशासनाची उच्चस्तरीय बैठक झाली आहे. या बैठकीत फाशीच्या प्रक्रियेवर चर्चा झाली. चौघांनाही फासावर लटकवल्यानंतर त्याचे मृतदेह हे तिहार जेल प्रशासन दीन दयाल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवणार आहे. फाशी दिल्यानंतर 8 वाजता शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होईल.

आता सर्व चारही दोषींच्या कुटुंबीयांना अजून शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात दिले जाणार आहे की, याची माहिती देण्यात आली नाही.

जर त्यांच्या कुटुंबीयांना मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला तर जेल प्रशासन त्यांच्यावर जेलमध्येच अंत्यसंस्कार विधी करेल.

दरम्यान, या चारही दोषींनी आपली अखेरची इच्छा बोलून दाखवलेली नाही. या चौ घांनी जेलमध्ये जे काम केलं, त्याचा मोबदला हा त्यांच्या कुटुंबीयांना दिला जाणार आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत फाशी टाळण्याचा खटाटोप

तर दुसरीकडे, पतियाळा कोर्टाने दोषींच्या सर्व याचिका फेटाळत फाशीला स्थगिती देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पण तरीही दोषींचे वकिलाचा शेवटच्या क्षणापर्यंत फाशी टाळण्याचा खटाटोप सुरू आहे.

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी वारंवार याचिका करून तारीख पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे सगळे मनसुबे अपयशी ठरले आहेत. फाशीला स्थगिती मिळवण्यासाठी दोषींच्या वकिलाने कुठलेही युक्तिवाद केले. 'त्यांना फाशी द्यायच्या ऐवजी जन्मठेप द्या. त्यांना पाकिस्तान बॉर्डरवर पाठवा किंवा डोकलामला पाठवा. ते देशाची सेवा करायला तयार आहेत. मी तसं लिहून देतो', असं दोषींचे वकील ए. पी. सिंग कोर्टापुढे म्हणाले.

फाशी देऊन बलात्काराच्या घटना थांबणार आहेत का, असाही युक्तिवाद सिंग यांनी केला. पण कोर्टाने त्यांचे सगळे युक्तिवाद फेटाळून लावत फाशीच्या तारखेवर शिक्कमोर्तब केलं.

आपल्या देशाच्या घटनेनुसार आणि कायद्यानुसार दुर्मिळातल्या दुर्मिळ आणि असामान्य गुन्ह्यासाठीच केवळ मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. फाशी देण्यासाठी बरेच नियम आणि प्रथा पाळल्या जातात. फाशीची तयारी कारागृह प्रशासन बराच काळ आधीपासून करत असते. मानवतेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारांना मृत्यूच्या वेळी कमीत कमी शारीरिक वेदना व्हाव्यात यासाठीही तयारी केली जाते. अशा अनेक प्रथांपैकीच एक म्हणजे फाशीची वेळ शक्यतो अंधारातली असते. सूर्योदयापूर्वी फाशी देण्याची पद्धत आहे. तसा नियम आहे. फाशीची तारीख 20 मार्च ठरल्यानंतर सकाळी 6 वाजता फाशी दिली जाईल, असं जाहीर करण्यात आलं. पण लगेचच ही वेळ बदलल्याची बातमी आली. 6 ऐवजी सकाळी 5.30 वाजता फाशी देण्यात येणार आहे. दिल्लीला त्या दिवशीच्या सूर्योदयाची वेळ पाहता फाशीच्या अंमलबजावणीची वेळही बदलण्यात आली असावी, अशी चर्चा आहे.

आतापर्यंत नेमकं काय झालं?

संपूर्ण देश हादरवणाऱ्या निर्भया गँगरेप केसमधील (Nirbhaya Gang Rape Case) दोषींना अखेर 20 मार्चला सकाळी 5.30 ला फाशी देण्याचं ठरलं आहे. कोर्टाने चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केलं आहे. याआधी तीन वेळा फाशीची तारीख आणि वेळ निश्चित झाल्यानंतर दोषींपैकी कुणी ना कुणी कोर्टाची दारं ठोठावत राहिल्यामुळे डेथ वॉरंट रद्द झालं होतं.

तीन वेळा रद्द झाल्यानंतर आता चौथ्या वेळी कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. यावेळी दोषींची फाशी अटळ असल्याचं बोललं जात आहे.

याचिकांवर याचिका, तारीख पे तारीख

निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकत्रितपणे 20 मार्च रोजी सकाळी फाशी देण्यात येईल. यापूर्वी 3 मार्च फाशीची तारीख ठरली होती. पण एक दोषी पवनकुमार गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका दाखल केल्याने सुनावणी सुरू झाली आणि फाशी रद्द झाली.

पवनची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींनीही त्याची दया याचिका फेटाळली आहे. पवन कुमारने आतापर्यंत सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला असून आता त्यांची फाशी अटळ असल्याचे सांगितलं जात आहे.

पवनने गुन्हा केला तेव्हा तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यापार्श्वभूमीवर त्याच्या फाशीच्या शिक्षेत बदल करुन जन्मठेप द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. दुसरा दोषी अक्षय यानेसुद्धा नव्याने दया याचिका दाखल केली होती. पण त्याचीही याचिका फेटाळण्यात आली आहे.

First published: March 19, 2020, 11:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या