निर्भयाच्या दोषींची फाशी पाहू शकणार फक्त 'ही' 5 लोक

निर्भयाच्या दोषींची फाशी पाहू शकणार फक्त 'ही' 5 लोक

दोषींना कुठल्याही क्षणी फाशी देण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार ही फाशी फक्त 5 लोक पाहू शकणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मार्च : निर्भयाचे चारही दोषी फाशीच्या शिक्षेतून सुटण्यासाठी अजुनही प्रयत्न करत होते. मात्र तीनही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगितीचा अर्जाची याचिका फेटाळून लावली आहे. दोषींना कुठल्याही क्षणी फाशी देण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार ही फाशी फक्त 5 लोक पाहू शकणार आहे.

यामध्ये कारागृह अधीक्षक, उपअधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आरएमओ आणि क्षेत्र दंडाधिकारी व दुसरा कर्मचारी यांचा समावेश असेल. याशिवाय फाशीची शिक्षा ठोठावलेल्या दोषीला पंडित किंवा मौलवी यांच्यासारख्या त्यांच्या धर्माचा कोणताही प्रतिनिधी हजर राहू शकतो. परंतु अशा दोषींनी याबद्दल कोणतीही मागणी केलेली नाही.

तीनही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगितीचा अर्जाची याचिका फेटाळली

दरम्यान, याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश मनमोहन आणि न्यायाधीश संजीव नरूला यांनी याला ठोस आधार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. न्यायालयाचा वेळ वाया घालवत असल्याचं म्हणत दोषींचे वकील एपी सिंगना फटकारलं. याचिकेत कोणतीही कागदपत्रे पूर्ण नाही. अॅनेक्सचर नाही, अॅफिडेव्हिट आणि कोणत्याच पक्षाचा मेमोसुद्धा नाही. न्यायालयाने कठोर शब्दात यावर सुनावणी करताना म्हटलं की, यात काहीही उरलेलं नाही. तुम्हाला ही याचिका दाखल कऱण्याची परवानगी आहे. यावर दोषींच्या वकिलांनी कागदपत्रांची पूर्तता करता आली नसल्याचं कारण पुढे केलं. यावर हद्द करत म्हटलं की, कोरोनामुळे झेरॉक्स दुकानं बदं आहेत. त्यामुळं कागदपत्र सादर कऱण्यासाठी पुरेसा वेळ दिला जावा.

न्यायालयाने यामध्ये काहीच ठोस नसल्याचं सांगत याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आता पहाटे दोषींना फाशी होण्यावर शिक्कामोर्तब झालं. न्यायाधीशांनी दोषींच्या वकिलांना सांगितलं की, तुमच्या क्लायंटना एकच काम करावं लागेल. आता त्यांची देवाला भेटण्याची वेळ आली आहे.

निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला. पतियाळा कोर्टाने दोषींच्या सर्व याचिका फेटाळत फाशीला स्थगिती देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पण तरीही दोषींचे वकिलाचा शेवटच्या क्षणापर्यंत फाशी टाळण्याचा खटाटोप सुरू होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2020 05:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading