पक्षातल्या राजकारणाला कंटाळून निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादी सोडली, उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे राष्ट्रवादी ला रामराम करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते गुरूवारी भाजपात प्रवेश करतील असं आता स्पष्ट झालंय.

Ajay Kautikwar | Updated On: May 23, 2018 03:18 PM IST

पक्षातल्या राजकारणाला कंटाळून निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादी सोडली, उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

ठाणे,ता.23 मे : राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे राष्ट्रवादी ला रामराम करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते गुरूवारी भाजपात प्रवेश करतील असं आता स्पष्ट झालंय. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादी सोडत असल्याचं ट्विट निरंजन यांनी केलं होतं.

त्यांची राष्ट्रवादीत घुसमट होत असल्याची चर्चा काही दिवसांपासून होत आहे. त्यातच निरंजन डावखरे समर्थक नगरसेवक भारत चव्हाण, मनोहर डुंबरे, अनिता भोईर, बाबा कदम, मुन्ना बिस्ट , दिलीप बनकर यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

डावखरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने भाजपच्या ठाणे आणि कोकणमधल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भाजप चे माजी आमदार आणि सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार विनय नातू, आमदार संजय केळकर, संदीप लेले, रत्नागिरी अध्यक्ष माजी आंनदार बाळ माने, निलेश चव्हाण हे नाराज असल्याची माहितीही सुत्रांनी दिलीय.

तर निरंजन डावखरे भाजपमध्ये जाणार अशी माहिती होती असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. अशा घटना पक्षाला नवीन नाहीत असं ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2018 03:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close