S M L
Football World Cup 2018

भारतातील 92 टक्के लोकांची संपत्ती 6.5 लाखाहूनही कमी

तसंच भारतातील 0.5 टक्के लोकांचं उत्पन्न 65 लाखाहून अधिक असल्याची माहिती या अहवालातून स्पष्ट झाली आहे. भारतातील लोकांची सरासरी मालमत्ता ही3 लाख ,88 हजारच्या आसपासची असल्याची माहिती या अहवालात स्पष्ट झाली आहे.पण तसंच या अहवालात एक आशावाद ही व्यक्त केला आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 22, 2017 12:31 PM IST

भारतातील 92 टक्के लोकांची संपत्ती 6.5 लाखाहूनही कमी

22 नोव्हेंबर: स्विस ब्रोकरेज क्रेडिट सुईसने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतातील 92 टक्के लोकांची मालमत्ता 6.50 लाखाहूनही कमी असल्याचं समोर आलंय. यामुळे देशात फक्त 8 टक्के  लोकंच श्रीमंत असल्याचे स्पष्ट होतं आहे.

तसंच भारतातील 0.5 टक्के लोकांचं उत्पन्न 65 लाखाहून अधिक असल्याची माहिती या अहवालातून स्पष्ट झाली आहे. भारतातील लोकांची सरासरी मालमत्ता ही3 लाख ,88 हजारच्या आसपासची असल्याची माहिती या अहवालात स्पष्ट झाली आहे.पण तसंच या अहवालात एक आशावाद ही व्यक्त केला आहे. भारतातील आर्थिक वाढ पाहता 2022पर्यंत भारतीयांच्या सरासरी मालमत्तेत 2022 पर्यंत विलक्षण वाढ होईल असं या अहवालाने सांगितलं आहे. आजच्या भारताची परिस्थितीही 90 वर्षांपूर्वीच्या अमेरिकासारखी आहे असंही या अहवालाने नोंदवलं आहे. जगात स्वित्झर्लंड ,ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील नागरिकांकडे  सर्वाधिक मालमत्ता असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. भारताचा शेजारी राष्ट्र असलेल्या चीनच्या 62 टक्के लोकांची एकूण मालमत्ता ही साडेसहा लाख रूपयांहून कमी असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

2022 पर्यंत लोकांच्या मालमत्तेमध्ये भारतात 12 टक्क्यांनी वाढ होईल असंही या अहवालात म्हटलं आहे. तसंच भारतीयांची एकूण संपत्ती गेल्या 17 वर्षात पाच पटीने वाढली आहे. पण तरी देखील भारतात गरिबीचं प्रमाण प्रचंड असल्याचं या अहवालात स्पष्ट झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close