धक्कादायक! गुढीपाडव्यादिनी मुंबईमध्ये आढळला 9 वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह

धक्कादायक! गुढीपाडव्यादिनी मुंबईमध्ये आढळला 9 वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह

ही मृत चिमुकली गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. दोन दिवसांनंतर मुलीचा मृतदेह जुहू परिसरात आढळला.

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल : गुढीपाडव्यादिनी मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या सगळ्यात गजबजलेल्या जुहू परिसरात एका 9 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही मृत चिमुकली गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. दोन दिवसांनंतर मुलीचा मृतदेह जुहू परिसरात आढळला. मृत चिमुकलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, सकाळच्या सुमारास स्थानिकांनी चिमुकलीचा मृतदेह पाहिला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

तर या शवविच्छेदनाच्या रिपोर्टनंतर मुलीच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल. त्यानंतर आरोपीला शोधता येईल असं पोलिसांचं म्हणणं आहे.

VIDEO: दादरच्या शोभायात्रेत अवतरली आर्ची; चाहतेही सैराट

First published: April 6, 2019, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading