मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /हैदराबादमध्ये 9 वर्षांच्या चिमुरडीनं कॅन्सरग्रस्तांसाठी सुरु केलं एक हजार पुस्तकांचं वाचनालय

हैदराबादमध्ये 9 वर्षांच्या चिमुरडीनं कॅन्सरग्रस्तांसाठी सुरु केलं एक हजार पुस्तकांचं वाचनालय

एका नऊ वर्षांच्या मुलीनेही अशीच एक कामगिरी (Hyderabad nine year old girl starts library) केली आहे, ज्यासाठी तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

एका नऊ वर्षांच्या मुलीनेही अशीच एक कामगिरी (Hyderabad nine year old girl starts library) केली आहे, ज्यासाठी तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

एका नऊ वर्षांच्या मुलीनेही अशीच एक कामगिरी (Hyderabad nine year old girl starts library) केली आहे, ज्यासाठी तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हैदराबाद, 31 जुलै:  मोठ्या माणसांना कदाचित सुचणारही नाही, अशा कल्पना लहान मुलांना सुचतात. यातूनच ही लहान मुलं अशी काही कामगिरी करून दाखवतात, ज्यामुळे मोठ्यांना त्यांचं आश्चर्य आणि कौतुकही वाटतं. हैदराबादमधल्या एका नऊ वर्षांच्या मुलीनेही अशीच एक कामगिरी (Hyderabad nine year old girl starts library) केली आहे, ज्यासाठी तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अगदी हैदराबादचे पोलीस आयुक्त (Hyderabad commissioner of Police) अंजानी कुमार यांनीही या चिमुरडीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

आकर्षणा सतीश (Akarshana Satish) असं या मुलीचं नाव आहे. अवघ्या नऊ वर्षांच्या आकर्षणाला वाचनाचं महत्त्व या लहान वयातच समजलं आहे. यामुळेच तिने तब्बल एक हजार पुस्तकं जमवून एक वाचनालय सुरू केलं आहे. विशेष म्हणजे, हे वाचनालय तिने हैदराबादमधल्या एमएनजे कॅन्सर इन्स्टिट्यूटमधल्या (MNJ Cancer Institute ) लहान मुलांसाठी सुरू केलं आहे. कॅन्सरग्रस्तांसाठी (Library for cancer patients) तिने उचललेलं हे पाऊल अनेकांना प्रेरणा देणारं आहे. 'दी न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

आपल्या उपक्रमाबाबत बोलताना आकर्षणाने सांगितलं, की अशा प्रकारचं वाचनालय उभारणं हे तिचं स्वप्नच होतं. कॅन्सरवरचे उपचार बरेच महिने चालतात. तसंच, त्यात केल्या जाणाऱ्या केमोथेरपीमुळे डोक्यावरचे सर्व केस निघून जातात. आधीच कॅन्सरसारखा आजार, त्यात डोक्यावरचे केस निघून गेल्यामुळे बऱ्याच वेळा या लहान मुलांसोबत खेळण्यास इतर मुलं नकार देतात; मात्र पुस्तकं हे आपले चांगले मित्र असतात. त्यामुळेच, कॅन्सरवरचे उपचार सुरू असलेल्या मुलांसाठी (Kids getting cancer treatment) आकर्षणाला वाचनालय सुरू करायचं होतं. या मुलांचं लक्ष उपचारांपासून इतर गोष्टींकडे वळवणं हादेखील यामागचा उद्देश होता, असंही तिने सांगितलं.

18 वर्ष दम्यावर केला इलाज पण फुप्फुसात अडकलं होतं भलतच काहीतरी, कोरोनामुळे झालं उघड

यासाठी आकर्षणाने तब्बल 1036 पुस्तकं गोळा केली आहेत. यामध्ये तेलुगू, इंग्लिश आणि हिंदी गोष्टींची पुस्तकं, तसंच काही कलरिंग बुक्सचा समावेश आहे. आकर्षणाने गेल्या वर्षभरात आपल्या मित्र-मैत्रिणींकडून आणि नातेवाईकांकडून ही पुस्तकं गोळा केली होती. यानंतर तिने एनएनजे इन्स्टिट्यूटला भेट देऊन आपल्या संकल्पनेबाबत माहिती दिली. तसंच, यासाठी ही सर्व पुस्तकं आपण देणार असल्याचंही तिनं सांगितलं. इन्स्टिट्यूटमधल्या अधिकाऱ्यांना तिची ही संकल्पना खूप आवडली. यासाठी त्यांनी लहान मुलांसाठी असलेल्या प्ले एरियाच्या एका भागाचं तातडीने वाचनालयात रूपांतर केलं.

मागण्या मान्य होईपर्यंत GST भरु नका, पंतप्रधान मोदींचा भाऊ प्रल्हाद मोदींचा व्यापाऱ्यांना सल्ला 

हैदराबाद पोलीस कमिशनर अंजनी कुमार यांनी या उपक्रमाबद्दल आकर्षणाचं कौतुक केले. तसंच, एक सन्मानचिन्ह देऊन तिचा सत्कारही करण्यात आला.

First published:

Tags: Hyderabad