विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी
पंढरपूर, 13 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे 9 आमदार भाजपच्या सर्पंकात असल्याचा गौप्यास्फोट खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडून करण्यात आला आहे. राज्यातील सत्तासंघर्ष अद्याप सुरूच आहे. आपल्या पक्षाच्या आमदारानी पक्षांतर करू नये यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेने काळजी घेतली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे 9 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. निंबाळकर यांच्या विधानामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन करण्यास असमर्थ ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झाली आहे. सत्तेसाठी विरोधी विचारधारा असलेले पक्ष एकत्र येण्याच्या घडामोडी सुरू आहेत. आमदार फोडाफोडीचे राजकारण होण्याची भीती राजकीय पक्षांना आहे. त्यात राष्ट्रवादीचे 9 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या निंबाळकरांच्या वक्यव्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे असं असताना आम्ही बहुमत सिद्ध करू असं नारायण राणे म्हणाले होते. बहुमतासाठी फक्त 145चा आकडा हवा आहे. तो मी आणेन असंही नारायण राणे म्हणाले होते. त्यामुळे भाजपच्या गोटातही सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असल्याचं समोर येतं.
अशातच काँग्रेस आणि शिवसेनेने आपले आमदार पक्षांतर करू नये म्हणून काळजी घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा घोडेबाजार होणार याची त्यांना भीती आहे. मात्र काँग्रेस, आणि शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचे 9 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माढ्यात आले होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीबाबत मोठं विधान केलं आहे. याचे आता काय राजकीय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकीकडे भाजपला एकटं पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. या सगळ्यात भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी माध्यमांवर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
BREAKING: शरद पवार माध्यमांवर चिडले, हे आहे कारण!
महाराष्ट्राच्या सत्ता कोंडीवर अमित शहांचं पहिलं विधान, आम्ही विश्वासघात केला नाही तर...
राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्यावर भाजचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया मांडली आहे. जर भाजप आणि शिवसेनेची महायुती विधानसभेमध्ये विजयी झाली तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं पंतप्रधान आणि मी काय म्हणत आलो. त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. पण आता मात्र त्यांनी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे अशा शब्दात अमित शहा यांनी शिवसेनेनं केलेला आरोप फेटाळला आहे.
इतर बातम्या - काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये काय बिनसलं? महत्त्वाची बैठक ऐनवेळी केली रद्द
शिवसेनेची ही मागणी मान्य नसल्याचंही अमित शहा यांनी म्हटलं आहे. ANI या वृत्तवाहिनीला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, 'राज्यपालांनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नाही. त्यांनी प्रत्येकाला समान वेळ दिला. महाराष्ट्रात 18 दिवस राज्यपालांनी वेळ दिली. विधानसेची वेळ संपल्यानंतर राज्यपालांनी पक्षांना निमंत्रण दिलं. राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी सगळ्यात जास्त वेळ दिला. सर्व पक्षांना पुरेसा वेळ देण्यात आला. ज्यांना सरकार स्थापन करायचं आहे त्यांच्याकडे आजही वेळ आहे' असं अमित शहा म्हणाले आहेत.
इतर बातम्या - शिवसेनेचं ठरलं, या तारखेला घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा