'संजय राऊतांना टीव्ही द्या आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना कॅडबरी चॉकलेट द्या'

'संजय राऊतांना टीव्ही द्या आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना कॅडबरी चॉकलेट द्या'

'शिवसेना नेते संजय राऊत यांना टीव्ही आणि लाईट बिलचे पैसे द्या, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कॅडबरी चॉकलेट द्या' अशा शब्दात ट्वीट करत निलेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 09 नोव्हेंबर : विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष भाजप आणि दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना हे युतीचं सरकार स्थापन करणार अशी चिन्ह असताना आता याच दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे. मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. यासगळ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर वारंवार पक्षाची ठाम भूमिका मांडली. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. यासगळ्यात माजी खासदार निलेश राणे यांनीही संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरजार टीका केली आहे.

'शिवसेना नेते संजय राऊत यांना टीव्ही आणि लाईट बिलचे पैसे द्या, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कॅडबरी चॉकलेट द्या' अशा शब्दात ट्वीट करत निलेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसतं आहे.

'संज्या राऊत इतका गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेला. बाकी राहुदे त्याला अगोदर कोणी तरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या. आणि उध्दव ला cadbury चॉकलेट द्या बिचाऱ्याला वाईट वाटलं की त्याला खोटारडा म्हटलं. शाळेत असल्यासारखा वाटलं त्याला बघून.' अशा शब्दात निलेश राणे यांनी ट्वीट केलं आहे.

राज्यात अद्यापही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांच्या सांगण्यावरून कार्यवाहू मुख्ममंत्री म्हणून फडणवीसांकडे राज्याची धुरा देण्यात आली आहे. पण यासगळ्यावर राज्यपाल आज किंवा उद्या विधानसभा निवडणुकांमध्ये सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देण्याची शक्यता आहे. सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी राज्यपाल हे भाजपला आमंत्रिक करण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

खंरतर विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मोठा पेच राज्यात निर्माण झाला आहे. अशात राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिल्यानंतरही भाजपची सरकार स्थापनेची काहीही तयारी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. एकीकडे असं असताना सेना-भाजपमधील डेडलॉक अजूनही कायम आहे. सत्तेच्या चर्चेसंदर्भात दोन्ही पक्षांकडून कोणतीही हालचाल नाही. कोणीही पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे चांगलं सरकार मिळवण्यासाठी जनतेला आणखी वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केलेलं भाष्य आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेलं उत्तर यामुळे युतीचे संबंध आणखी ताणले गेले. आमच्याकडे दुसरे पर्याय खुले आहेत, असं शिवसेना नेते म्हणत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे. शरद पवार यांनी प्रभावी विरोधी पक्ष हीच आमची जबाबदारी असल्याचा आज पुनरुच्चार केला. शिवसेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार अजून झालेला नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

अयोध्या प्रकरणाच्या निकालासंबंधात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही, असं सांगितलं. "अयोध्येच्या निकालावरून महाराष्ट्रातलं राजकारण बदलणार नाही. लोक दोन-तीन दिवसात लोक विसरून जातील," असं पवार म्हणाले. राज्यातल्या परिस्थितीबद्दल विचारलं असता शरद पवार म्हणाले, "पुन्हा एकदा सांगतो... बहुमत आहे त्यांनी सरकार बनवावं. युतीला जनतेनं कौल दिला आहे. प्रभावी विरोधी पक्ष ही आमची जबाबदारी आहे."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 05:29 PM IST

ताज्या बातम्या