News18 Lokmat

VIDEO- निकमुळे पायऱ्यांवरून पडता- पडता वाचली प्रियांका चोप्रा

नुकतीच प्रियांका जोनस ब्रदर्ससोबत एका कॉन्सर्टला गेली होती. याचाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 04:30 PM IST

VIDEO- निकमुळे पायऱ्यांवरून पडता- पडता वाचली प्रियांका चोप्रा

न्यूयॉर्क, ८ एप्रिल- लग्नानंतर असा एकही दिवस नसेल जेव्हा प्रियांका चोप्रा चर्चेत आली नसेल. नुकतेच जोनस ब्रदर्सचा म्युझिक व्हिडीओ सर्कसमध्ये प्रियांका चोप्रा दिसली होती. या व्हिडीओमध्ये केविन जोनसची पत्नी डेनिअल आणि जो जोनसची गर्लफ्रेंड सोफी टर्नरही दिसते. या व्हिडीओमुळेही प्रियांका चर्चेत राहिली होती. नुकतीच प्रियांका जोनस ब्रदर्ससोबत एका कॉन्सर्टला गेली होती. याचाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पायऱ्या उतरताना प्रियांका घसरून पडणार तोच तिने निकचा आधार घेतला.

जोनस ब्रदर्सच्या कॉन्सर्टला गेलेल्या प्रियांकाने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले. यात तिचं पूर्ण कुटूंब दिसत आहे. पण सध्या सोशल मीडियावर भलताच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चालताना ती अडखळताना दिसत आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती नेहमीप्रमाणे निकच्या हातात हात घालून पायऱ्या उतरत होती. पण अचानक तिचा तोल गेला आणि ती अडखळली.


त्या कॉन्सर्टमध्ये जोनस ब्रदर्ससाठी चाहते वेडे होत होते आणि प्रियांकाही त्यांना हात हलवत अभिवादन करत होती. याचवेळी प्रियांका पायऱ्या उतरतही होती, तेवढ्यात तिचा तोल गेला. पण निकच्या हातात तिचा हात असल्यामुळे तिने पडताना सर्व भार निकच्या अंगावर टाकला. निकनेही यावेळी तिला आधार दिला. या घटनेनंतर प्रियांका स्वतःवरच हसताना दिसत होती.

काश्मिरी युवक आणि जवानांमध्ये तणाव, थेट घटनास्थळावरील VIDEO आला समोर

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 8, 2019 04:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...