• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • भारतात ISIS, एनआयएची पुन्हा मोठी कारवाई

भारतात ISIS, एनआयएची पुन्हा मोठी कारवाई

राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी(एनआयए)ने दिल्ली आणि अमरोहामध्ये रविवारी पुन्हा एकदा मोठी छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 डिसेंबर : राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी(एनआयए)ने दिल्ली आणि अमरोहामध्ये रविवारी पुन्हा एकदा मोठी छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून मोठ्या संख्येने हत्यारं आणि ISISचे पॅमप्लेट जप्त केली आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने जाफराबाद, सीलमपुर परिसरात आणि अमरोहमध्ये छापेमारी केली. या आठवड्याची ही दुसरी छापेमारी आहे. NIA (राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी) ने दिल्ली आणि उत्तर प्रदेशात छापे घालून 10 संशयित अतिरेक्यांना ताब्यात घेतलं. NIAच्या छाप्यांमध्ये उघड झालेल्या 10 महत्त्वाच्या गोष्टी या प्लॅनचा मास्टरमाइंड परदेशात असण्याची शक्यता NIAचे प्रमुख अलोक मित्तल यांनी वर्तवली आहे. एक-दोन नव्हे तर शेकडो बाँब बनवण्याची त्यांची तयारी होती. प्रजासत्ताकदिनाच्या आसपास स्फोट घडवण्याचा त्यांचा प्लान होता. 112 अलार्म क्लॉक्स आणि बॅटऱ्या यावेळी जप्त करण्यात आल्या. रिमोट कंट्रोल टायमर बाँब आणि रॉकेट बनवण्याच्या ते तयारीत होते. बाँब बनवण्याचं साहित्य आणि 25 किलो स्फोटकं त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. 7 जेशी बनावट रॉकेटही त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या तरुणांनी सोनं चोरून पैशांची व्यवस्था केली होती. साडे सात लाखांची रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. छाप्यांमध्ये पकडलेल्यांपैकी एक तरुण सिव्हिल इंजिनिअर, 2 बीए, 2 विद्यार्थी आणि काही उच्चशिक्षितही होते. मुफ्ती सोहेल नावाचा मशिदीचा मौलवी हा या कटामागचा सूत्रधार असण्याची शक्यता आहे. सध्या तो NIA च्या ताब्यात आहे. देशातील महत्त्वाची शहरं आणि VIP अतिरेक्यांच्या टार्गेट लिस्टमध्ये होते. रिमोट कंट्रोलने बाँबस्फोट आणि काही फिदायन अॅटॅक म्हणजे आत्मघातकी हल्ले करण्याचा प्लान शिजत होता. या प्लानचा मास्टरमाइंड परदेशात असण्याची शक्यता NIAचे प्रमुख अलोक मित्तल यांनी वर्तवली आहे. VIDEO : 'एक दुजे के लिये' म्हणत विष पिऊन फिरत होते प्रेमी युगुल, व्हिडिओ व्हायरल
  First published: