VIDEO : सुजय विखे पाटलांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा, शरद पवारांनी दिला 'ग्रीन सिग्नल'

VIDEO : सुजय विखे पाटलांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा, शरद पवारांनी दिला 'ग्रीन सिग्नल'

लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरच्या जागेवरून सस्पेंन्स निर्माण झाला होता. अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा ही काँग्रेससाठीच असल्याचं स्पष्ट केलं आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे आणि सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

पुणे, 01 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरच्या जागेवरून सस्पेंन्स निर्माण झाला होता. अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा ही काँग्रेससाठीच असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नगरमधून सुजय विखे पाटलांचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरच्या बदल्यात राष्ट्रवादीने औरंगाबादची जागा आपल्याकडे घेतल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीत जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. नगरची जागा मिळत नसल्यामुळे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे - पाटील यांचा मुलगा सुजय विखे - पाटलांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतला.जवळपास सुजय विखे पाटील यांनी अपक्ष लढवण्याचीही तयारी केली. परंतु, आता शरद पवार यांनी नगरची जागाही काँग्रेससाठी सोडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. नगरच्या बदल्यात राष्ट्रवादीने औऱंगाबादची जागा आपल्या ताब्यात घेतली आहे. औरंगाबादची जागा राष्ट्रवादी लढण्याची शक्यता आहे.

नगरमध्ये का झाला वाद निर्माण?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी केली आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र नगरची जागा सोडण्यासाठी तयार नव्हतं. पण, त्यापूर्वीचं राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे यांना पक्षात घेत उमेदवारीचे संकेत दिले. अनुराधा नागवडे यांचा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. पण, आता ही जागा काँग्रेसला सोडली आहे. त्यामुळे नगरमधून सुजय विखे पाटलांना निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

===================

First published: March 1, 2019, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading