मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

रेल्वे तिकीट बुकिंग होणार एका मिनिटात; रिफंडही मिळणार तातडीने

रेल्वे तिकीट बुकिंग होणार एका मिनिटात; रिफंडही मिळणार तातडीने

 त्यामुळे रेल्वे प्रवाशांना ट्रेन तिकीट बुकिंग करणे अधिक सुलभ होणार आहे.

त्यामुळे रेल्वे प्रवाशांना ट्रेन तिकीट बुकिंग करणे अधिक सुलभ होणार आहे.

त्यामुळे रेल्वे प्रवाशांना ट्रेन तिकीट बुकिंग करणे अधिक सुलभ होणार आहे.

  • Published by:  Aiman Desai

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : इंडियन रेल्वे टुरिझम अॅण्ड  केटरिंग कार्पोरेशनने (IRCTC) नुकतीच आपली वेबसाईट अपग्रेड केली आहे. तसेच आयआरसीटीसी- आयपे (IRCTC-iPay) हा पेमेंट गेट-वे (Payment Gateway) देखील सुरु केला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना ट्रेन तिकीट बुकिंग करणे अधिक सुलभ होणार आहे. यामुळे वेळेची देखील बचत होणार आहे. तसेच एखाद्या प्रवाशाने तिकीट बुकिंग रद्द केले तर रिफंडची रक्कम तातडीने त्याच्या खात्यावर जमा होणार आहे.

असा होणार फायदा

आयआरसीटीसी- आयपेने दिलेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसी वेबसाईट किंवा अॅपचा वापर करणाऱ्या प्रवाशांना तत्काळ रिफंड (Refund) दिला जाईल. या सुविधेसाठी प्रवाशांना त्यांच्या युपीआय बॅंक खाते किंवा अन्य दुसऱ्या साधनांव्दारे डेबिट करण्यासाठी एकदाच परवानगी द्यावी लागेल. त्यानंतर ते पेमेंट इन्स्ट्रुमेंट पुढील ट्रान्झॅक्शनसाठी ग्राह्य ठरेल. त्यानंतर जेव्हा कधी संबंधित प्रवासी बुकिंग रद्द करेल, त्यानंतर लगेलच रिफंड त्याच्या खात्यात जमा होईल. आयआरसीटीसीच्या या सुविधेमुळे दररोज तिकीट बुकिंग करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यामुळे तिकीट बुकिंग तातडीने तर होईल तसेच रिफंड तसंच कर्न्फम तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल.

हे ही वाचा-कमी भांडवलात जास्त नफा; 'या' व्यवसायात दिवसाला होईल 4000 रुपयांपर्यंतची कमाई

यापूर्वी रिफंडला होत होता उशीर

यापूर्वी जेव्हा प्रवासी ट्रेनचे तिकीट बुक करीत होते, तेव्हा त्यांना तिकीट कर्न्फम मिळत नव्हते किंवा काही कारणांनी त्यांनी तिकीट रद्द केले तर रिफंड मिळायला 1 ते 2 दिवस लागायचे. कारण तेव्हा आयआरसीटीसी बॅंक गेटवेचा वापर करीत नव्हते. परंतु, आता आयआरसीटीसीने आपली वेबसाईट अपग्रेड केली आहे.

आयआरसीटीसी नेमके कसे आहे?

आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या आत्मनिर्भर भारत या अभियानानुसार आम्ही युझर इंटरफेस अपग्रेड केले आहे. ही इंटरनेट तिकीट वेबसाईट आशिया –पॅसिफिकमधील सगळ्यात मोठी ई-काॅमर्स वेबसाईटपैकी एक ठरली आहे. भारतीय रेल्वेच्या एकूण तिकीट बुकींगपैकी 83 टक्के बुकींग हे आयआरसीटीसीवर होते. ही यंत्रणा वापरण्यासाठी अधिक सुलभ ठरावी, यासाठी आम्ही त्यात सातत्याने सुधारणा करीत आहोत असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

First published:

Tags: Business News, Indian railway, IRCTC