News18 Lokmat

बीडमध्ये मुंडे भगिनींना बहुजन विकास मोर्च्याचा धक्का, घेतला हा निर्णय

बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष दलित नेते बाबुराव पोटभरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंडे भगिनींवर जोरदार टीका केली.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 07:36 PM IST

बीडमध्ये मुंडे भगिनींना बहुजन विकास मोर्च्याचा धक्का, घेतला हा निर्णय

सुरेश जाधव, प्रतिनिधी

8 एप्रिल : बीड लोकसभा निवडणुकीत महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची बहिणी आणि भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना बहुजन विकास मोर्च्याने धक्का दिला आहे. या संघटनेनं राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठिंबा देत भाजपला धडा शिकवू असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढली आहे.

बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष दलित नेते बाबुराव पोटभरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंडे भगिनींवर जोरदार टीका केली. 'पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंची सामाजिक चळवळ संपुष्टात आणली. भाजप दलित, आदिवासी, ओबीसींच्या प्रश्नावर सपशेल फेल ठरले आहे. देशात जेवढे आरोप झाले नाहीत ते एकट्या जिल्ह्यातील पंकजा मुंडेंवर झाले आहे. मुंडे भगिनींनी बीड जिल्ह्यातील जनतेला वेठबिगारा प्रमाणे वेठीस धरले आहे. भाजपच्या आमदारांनी टक्केवारी घेवून रस्त्यांची बोगस कामे करतांना डोळेझाक केली. पंकजा मुंडेंचे सगळे आमदार हे टक्के आमदार आहेत. जिल्ह्यातील कोट्यवधीची काम बोगस आहेत,' असा आरोपही त्यांनी केला.

बाबुराव पोटभरे हे दलित चळवळीत सक्रिय नेते असून बीड जिल्ह्यासह महाराष्टात मोठा जनसंपर्क आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत अनेक वर्ष सक्रीय राजकारणात होते. मागच्या काही वर्षांपासून पंकजा मुंडेंच्या नेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आज पत्रकार परिषद घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठिंबा देत भाजपाला धडा शिकवू असा पवित्रा घेतला आहे. यावेळी बोलतांना म्हणाले की, 'जिल्ह्यात फक्त पंकजा मुंडे आणि बहिणींचा विकास झाला या गोष्टीकडे कर्तव्य दक्ष नागरिक म्हणून याकडे लक्ष दिले पाहिजे. भाजपला हरवण्याची ताकद राष्ट्रवादीच्या उमेदवारात आहे. म्हणून मी पाठिंबा दिला आहे. आमची लढाई विचारांची आहे, असंही बाबुराव पोटभरे म्हणाले.

============================================================

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 05:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...