‘चला नाती जपू या’ च्या निर्मात्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

‘चला नाती जपू या’ च्या निर्मात्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

'चला नाती जपूया', 'सासू-सुनेनी कसे रहावे', 'आई', 'एकत्र कुटुंब पद्धती आणि मुली' या विषयांवर त्यांचे व्हिडिओ युट्युबवर मोठ्या प्रमाणात गाजले.

  • Share this:

सोलापूर, 28 एप्रिल :   सोलापूरच्या ज्येष्ठ महिला विधिज्ञ, लोकप्रिय वक्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन झाले आहे. त्या 65 वर्षांच्या होत्या.  पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांच्यावर  गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज सकाळी 11.45 वाजता  त्यांची प्राणज्योत मालवली.

लव्ह जिहादच्या चळवळीच्या महाराष्ट्रातील प्रणेत्या म्हणून अपर्णा रामतीर्थकर यांची ओळख होती. राज्यभरात ठिकठिकाणी महिला, समाज आणि लव्ह जिहादबद्दल त्या व्याख्यानं  देत होत्या. 'चला नाती जपूया', 'सासू-सुनेनी कसे रहावे', 'आई', 'एकत्र कुटुंब पद्धती आणि मुली' या विषयांवर त्यांचे व्हिडिओ युट्युबवर मोठ्या प्रमाणात गाजले आणि त्यांच्यावर टीकाही झाली.

हेही वाचा - 'आम्ही कोरोनातच का नाही मेलो', महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचं भयाण वास्तव समोर

अपर्णा रामतीर्थकर यांनी मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या.   त्यानंतर अपर्णा रामतीर्थकर यांनी 2001 पासून सामाजिक कार्याला स्वत:ला वाहून दिलं होतं.  2008 पासून ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदाऱ्या’ या विषयांवर त्यांनी अनेक भाषणं दिली होती.

अपर्णा रामतीर्थकर यांनी सामजिक कार्यातही आपला हातभार लावला होता. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ इथं  पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्या आश्रम शाळाही चालवत होत्या. व्याख्यनातून मिळणारे मानधन हे शाळेवर खर्च करत होत्या.

हेही वाचा - मुंबईहून 1600 किमी चालत गाठलं घर, क्वारंटाइन केल्यानंतर 6 तासांतच...

रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली.  सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थेवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी स्तंभलेखनही केलं होतं.  ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत्या. रामतीर्थकर यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त केलं जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.

 संपादन - सचिन साळवे

First published: April 28, 2020, 1:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या