सीआरपीएफ जवानाचा आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार, 3 जणांचा मृत्यू

सीआरपीएफ जवानाचा आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार, 3 जणांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील सीमासुरक्षा दलाच्या 187 बटालियन कॅम्पमध्ये ही घटना घडली.

  • Share this:

जम्मू, 21 मार्च : सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने आपल्याच जवानांवर गोळीबार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 3 जवानांचा मृत्यू झाला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील सीमासुरक्षा दलाच्या 187 बटालियन कॅम्पमध्ये ही घटना घडली.

लष्कराला हादरावून सोडणारी ही घटना आज रात्री 10 वाजेच्या सुमारास जम्मू आणि काश्मीरमधील सीआरपीएफच्या 187 बटालियनच्या कॅम्पमध्ये घडली. बटालियनच्या कॅम्पमध्ये काॅन्स्टेबल अजित सिंह याने आपल्या सर्व्हिस रायफलमधून अचानकपणे आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केला. यात 3 जणांचा मृत्यू झाला. पोकरमल, योगेंद्र शर्मा आणि उमेंद सिंह अशी या तिन्ही जवानांची नावं आहे.

तिघांवर गोळीबार केल्यानंतर अजित याने स्वत:वर गोळी झाडून घेतली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजित सिंह कानपूर येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. त्याने हे कृत्य का आणि कशासाठी केले याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

घटनास्थळी सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आले आहे.

(सांकेतिक छायाचित्र)

Loading...

===============


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 12:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...