• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • Live Update : भाजप कोअर कमिटीची उद्या शिंदे गटासोबत बैठक, खातेवाटपावर होणार चर्चा

Live Update : भाजप कोअर कमिटीची उद्या शिंदे गटासोबत बैठक, खातेवाटपावर होणार चर्चा

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारचा विजय झाला असला तरी त्यांची महत्त्वाची परीक्षा उद्या होणार आहे.

 • News18 Lokmat
 • | July 03, 2022, 22:39 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  22:50 (IST)

  उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
  अजय चौधरींची गटनेतेपदाची मान्यता रद्द
  एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते
  विधिमंडळ सचिवालयाचं शिंदे यांना पत्र
  सुनील प्रभूंचंही मुख्य प्रतोदपद रद्द
  भरत गोगावलेंची मुख्य प्रतोदपदी निवड
  विधिमंडळ सचिवालयानं दिली मान्यता

  22:27 (IST)

  भाजप कोअर कमिटीची उद्या संध्याकाळी 7 वा. महत्त्वपूर्ण बैठक, शिंदे गटासोबत खातेवाटपावर चर्चा होणार, फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर बैठकीची शक्यता; पियूष गोयल, एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

  21:44 (IST)

  'ओबीसी आरक्षणाचा लढा अनेक महिने सुरूच'
  नव्या सरकारनं सहकार्य करणं अपेक्षित - भुजबळ
  जवळपास काम पूर्ण, 12 जुलैला सुनावणी - भुजबळ
  पुढच्या निवडणुका आरक्षणासोबत होतील - भुजबळ

  21:25 (IST)

  शरद पवारांचं राष्ट्रवादी आमदारांना मार्गदर्शन
  नवं सरकार जास्त काळ टिकणार नाही - पवार
  शिंदे सरकार 5 ते 6 महिने टिकेल - शरद पवार
  'त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा'
  मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या - शरद पवार
  शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी - पवार
  'मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी बघायला मिळेल'
  बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता - पवार
  'सरकार पडलं तर मध्यावधी निवडणुका लागतील'
  त्यामुळे आतापासून तयारीला लागा - शरद पवार

  21:14 (IST)

  विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या उद्या दुसऱ्या दिवशी शिवसेना-भाजप युती सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचे आहे. यावेळी नक्की सरकारची रणनीती काय असेल यावर आज सर्व आमदारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. आज पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये देखील सरकार नक्की यशस्वी ठरेल अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.  

  यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे प्रतोद भरतशेठ गोगावले, आमदार दीपक केसरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेना-भाजप युतीचे तसेच सहयोगी पक्षांचे आमदार उपस्थित होते.

  20:41 (IST)

  यशवंतराव चव्हाण सेंटरमधील बैठक संपली
  शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
  उद्याच्या बहुमत चाचणीवर बैठकीत चर्चा
  विरोधी पक्षनेतेपद निवडीवरही बैठकीत चर्चा

  20:39 (IST)

  भाजप आमदारांची ताज प्रेसिडेंटमधील बैठक संपली
  बहुमत चाचणीच्या रणनीतीबाबत बैठकीत चर्चा
  बहुमत चाचणीबद्दल बैठकीत चर्चा - गणेश नाईक
  'बहुमत चाचणीबाबत आम्हाला मार्गदर्शन केलं'
  हे शिवसेना-भाजपचं सरकार आहे - गणेश नाईक

  20:6 (IST)

  भाजप आमदारांची मुंबईतील प्रेसिडंन्ट हॅाटेल मध्ये महत्वाच्या बैठकीला सुरूवात उद्याच्या फ्लोअर टेस्टसाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे

  19:51 (IST)

  शिवसेना खासदार संजय राऊत यांना शिवडी कोर्टाने समन्स बजावला आहे. या समन्सनुसार त्यांना 4 जुलैला सकाळी 11 वाजता शिवडी कोर्टात हजर राहावं लागणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी कोर्टाने हे समन्स बजावले आहेत. किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. 

  19:38 (IST)

  अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण नियमांचे पालन करत जिंकली आहे - राम कदम
  नियमाच उल्लंघन झालं असेल तर विरोधकांनी केले आहे - राम कदम
  आम्ही एकाही नियमाचा भंग केला नाही - राम कदम
  उद्याची बहूमत चाचणी जिंकू - राम कदम
  हताश, निराश झालेल्या लोकांकडून अशी विधान केली जात आहेत - राम कदम

  विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आज पार पडणार आहे.  भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना मैदानात उतरवले आहे.  एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आमदार आमने-सामने येणार आहेत.