• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • Live Update : एकनाथ शिंदे गट सुप्रीम कोर्टात, वकील कपिल सिब्बल मविआची बाजू मांडणार

Live Update : एकनाथ शिंदे गट सुप्रीम कोर्टात, वकील कपिल सिब्बल मविआची बाजू मांडणार

देशातील सहा राज्यांमधील लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 7 जागांवरील पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. या सर्व जागांवर 23 जून रोजी मतदान झाले होते.

 • News18 Lokmat
 • | June 27, 2022, 00:25 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  0:24 (IST)

  जळगाव ग्रामीण परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

  दोन दिवसाच्या पावसाने अनेक हेक्टर वरील केळी जमीनदोस्त

  पंचनामे करून ही मागील नुकसानाची भरपाई अद्यापही मिळाली नाही

  22:9 (IST)

  सुभाष भोईर यांची शिवसेना ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड

  21:0 (IST)

  कोर्टात एकनाथ शिंदे यांची बाजू ज्येष्ठ वकील हरीश साळवे माडतील. तर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे महाविकास आघाडीची सुप्रीम कोर्टात बाजू मांडतील.

  19:48 (IST)

  एकनाथ शिंदे गटाला बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना हायकोर्टात आव्हान, अजय चौधरींच्या नियुक्तीलाही याचिकेद्वारे आव्हान, शिंदे गटाच्या आमदारांना पोलीस संरक्षण देण्याचीही याचिकेत मागणी, एकनाथ शिंदे गटातील दोन सदस्यांची याचिका सुप्रीम कोर्टात

  19:35 (IST)

  आमदार निलंबन, गटनेता कारवाईचा मुद्दा
  शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका - सूत्र
  अपात्रतेच्या कारवाईविरोधात शिंदे गटाची धाव
  शिंदे गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणीची शक्यता

  18:18 (IST)

  शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का
  उदय सामंत गुवाहाटी विमानतळावर
  थोड्याच वेळात हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये
  मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामील

  18:10 (IST)

  अडीच वर्षं सोबत, आता तक्रारी का? - पवार
  भाजपकडून सरकार पाडण्याचे प्रयत्न - पवार
  आजही आमची आघाडी आहे, राहील - पवार
  कारवाईचा निर्णय उद्धव ठाकरेंकडे - शरद पवार
  'आज किंवा उद्या काही कारवाईची शक्यता'
  16 आमदारांवर कारवाईची शक्यता - पवार

  18:3 (IST)

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत
  यशवंत सिन्हा अर्ज उद्या भरणार - पवार
  'भाजपविरोधी पक्ष एकत्र येत अर्ज भरतील'
  'राष्ट्रपतीपदाबाबत रणनीती ठरवणार'
  'निवडणूक जिंकण्यासाठी लढायची असते'
  ही तत्त्वाची लढाई आहे - शरद पवार
  गेलेले सर्व आमदार परत येतील - पवार
  उद्धव ठाकरेंना पूर्णपणे पाठिंबा - पवार
  सत्तापरिवर्तनासाठी शिंदे गटाचं बंड - पवार
  राष्ट्रपती राजवटीची शक्यता कमी - पवार
  'संख्याबळ आहे तर गुवाहाटीत का थांबले?'

  17:51 (IST)

  बंड करण्याच्या लायकीचे नाहीत - आदित्य ठाकरे
  आदित्य ठाकरेंची शिंदे गटाच्या आमदारांवर टीका
  'खोटारडेपणाचा चिरफाड करायला रस्त्यावर'
  'पक्षात काही जणांना खूप मोठं स्थान दिलं'
  हिंमत असेल तर समोर या - आदित्य ठाकरे
  या लोकांविरोधात लढाई सुरू - आदित्य ठाकरे
  सुरत, गुवाहाटीला भाजप नेते कसे गेले? - आदित्य
  हे वाघ असते तर पळून गेले नसते - आदित्य ठाकरे
  'भाजप नाही तर प्रहारमध्ये विलीन व्हावं लागेल'
  युवासेनेचा मला अभिमान आहे - आदित्य ठाकरे
  'नाव जपा, नाव एकदा गेलं की परत येत नाही'
  हा लढा दोन आठवड्यांत चिरडू - आदित्य ठाकरे
  यांना पाडल्याशिवाय राहणार नाही - आदित्य ठाकरे
  देशात लोकशाही उरली नाही - आदित्य ठाकरे

  17:44 (IST)

  बंड करण्याच्या लायकीचे नाहीत - आदित्य ठाकरे
  आदित्य ठाकरेंची शिंदे गटाच्या आमदारांवर टीका
  'खोटारडेपणाचा चिरफाड करायला रस्त्यावर'
  'पक्षात काही जणांना खूप मोठं स्थान दिलं'
  हिंमत असेल तर समोर या - आदित्य ठाकरे
  या लोकांविरोधात लढाई सुरू - आदित्य ठाकरे
  सुरत, गुवाहाटीला भाजप नेते कसे गेले? - आदित्य
  हे वाघ असते तर पळून गेले नसते - आदित्य ठाकरे
  युवासेनेचा मला अभिमान आहे - आदित्य ठाकरे
  हा लढा दोन आठवड्यांत चिरडू - आदित्य ठाकरे

  देशातील सहा राज्यांमधील लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 7 जागांवरील पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. या सर्व जागांवर 23 जून रोजी मतदान झाले होते. उत्तर प्रदेशातील आझमगड, रामपूर आणि पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती.  आझम खान यांचा बालेकिल्ला असलेल्या रामपूरमध्ये भाजपने लोकसभा पोटनिवडणुकीत 42000 हून अधिक मतांनी दणदणीत विजय नोंदवला आहे.  बसपाचे उमेदवार गुड्डू जमाली यांनी आझमगड लोकसभा पोटनिवडणुकीत आपला पराभव स्वीकारला आहे. ते म्हणाले की, सध्या सपा आणि भाजपमध्ये जो विजयी होईल त्याचे अभिनंदन.