'न्यूज18 लोकमत' इम्पॅक्ट, ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना केला फोन

'न्यूज18 लोकमत' इम्पॅक्ट, ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना केला फोन

पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ऊसतोड मजुरांच्या प्रश्नाबाबत तात्काळ व्यवस्था करण्यासंदर्भात मागणी केली आहे.

  • Share this:

बीड, 28 एप्रिल : क्वारन्टाइन करण्यात आलेल्या ऊसतोड मजुरांच्या संघर्षाला वाचा फोडत त्यांची परिस्थिती न्यूज18 लोकमतने महाराष्ट्रासमोर आणली. त्यानंतर या वृत्ताची दखल घेत भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ऊसतोड मजुरांच्या प्रश्नाबाबत तात्काळ व्यवस्था करण्यासंदर्भात मागणी केली आहे.

बीड तालुक्यातील पेडगाव,कामखेडा,दगडी शाहजहानपूर येथील 10 ते 20 ऊसतोड मजूर कुटुंब त्यांच्या गावापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराळ माळरानावर टेंबी येथे थांबले आहेत. त्यांना याठिकाणी शासनाकडून कुठली मूलभूत व्यवस्था करण्यात आली नाही, असे हे ऊसतोड मजूर सांगत आहेत. चक्क तीन किलोमीटर उन्हातानात पायी जाऊन पाणी आणावं लागत अस या महिला सांगत आहेत.

ऊसतोड मजुरांच्या दोन वेळेच्या जेवणाचीही मोठी पंचाईत झाली आहे. जवळची शिदोरी होती, ती कारखान्यावर संपली. इथे आल्यानंतर रेशन मिळेल असं वाटत होतं, मात्र अद्याप या कुटुंबांना रेशन मिळाले नाही. त्यामुळे या ऊसतोड मजुरांनी स्वत:सोबत आपल्या लहान मुलांना कसं जगवायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. पंकजा मुंडे यांनी दखल घेत तात्काळ बीड कलेक्टर यांना फोन करून व्यवस्था करण्याबाबत मागणी केली आहे. मात्र यानंतर तरी ऊसतोड मजुरांची पाण्यासाठीची पायपीट थांबते का, हे पाहावं लागणारं आहे.

'कोरोनामध्ये मेले असतो तर बरं झालं असतं'

'व्यवस्था करू म्हटले, पण काही व्यवस्था नाही. कारखान्यावरंच बरं होतं. इथं जास्त हाल होत आहेत. पाणी नाही, काम नाही, कारखान्यावरचे आणलेले पैशे संपले. आत्ता खायला काहीच नाही, उपाशी मारतंय का सरकार? काही तरी द्या ! पाण्याची सोय नाही, लहान लहान लेकराला मारायचं ठरवलं का? कोरोनामध्ये मेले असतो तर बरं झालं असतं. इथं गावातले म्हणतेत गावात येऊ नका इथं काय खायचं?' असा प्रश्न वैतागलेले ऊसतोड मजूर करत आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 28, 2020, 4:42 PM IST

ताज्या बातम्या