अपघातः लग्नानंतर 16 व्या दिवशी दाम्प्त्याचा मृत्यू , ट्रेलर कापून बाहेर काढले 11 मृतदेह
अपघात इतका भीषण होता की ट्रेलर पूर्ण पिकअर कारमध्ये घुसला होता. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाची पाहिणी केल्यानंतर अक्षरश: ट्रेलर कापून मृतदेह बाहेर काढले आहेत.
जोधपूर, 14 मार्च : ट्रेलर आणि पिकअप कारच्या धडकेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील सोईन्तरा गावात शनिवारी सकाळी हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की पिकअप कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात 4 पुरुष 6 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थऴी धाव घेतली. त्यानी ट्रेलर बाजूला करून जखमींना बाहेर काढलं आहे. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णलयात दाखल कऱण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये नवविवाहित दाम्पत्याचाही मृत्यू झाला आहे. त्यांचं नुकतच लग्न झालं होतं. त्यांच्यावर काळानं घाला घातला. या अपघातात चिमुकल्याचाही जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विटरवरून दु:ख व्यक्त केलं आहे.
Deeply saddened to learn about tragic accident on Balotra-Phalodi Mega Highway in Shergarh area,#Jodhpur in which 11 people have lost lives. My heartfelt condolences to those who lost their loved ones,may god give them strength to bear this loss. I wish speedy recovery to injured
हा अपघात इतका भीषण होता की ट्रेलर पूर्ण पिकअर कारमध्ये घुसला होता. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाची पाहिणी केल्यानंतर अक्षरश: ट्रेलर कापून मृतदेह बाहेर काढले आहेत. अपघाताचं कारण अद्याप समजू शकलं नाही मात्र गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.