NZ vs BAN : क्रिकेटच्या मैदानात फूटबॉल स्किल, पाहा हा अफलातून रन आऊट

NZ vs BAN : क्रिकेटच्या मैदानात फूटबॉल स्किल, पाहा हा अफलातून रन आऊट

'क्रिकेट इज ए गेम ऑफ ग्लोरिअस अनसर्टन्टीज'अर्थात'क्रिकेट (Cricket) हा वैभवशाली अनिश्चिततेचा खेळ आहे, असं म्हटलं जातं. न्यूझीलंड आणि बांग्लादेश (New Zealand vs Bangladesh) यांच्यादरम्यान झालेल्या दुसऱ्या वनडे (ODI) सामन्यादरम्यान याची प्रचिती आली.

  • Share this:

क्राईस्टचर्च, 23 मार्च : 'क्रिकेट इज ए गेम ऑफ ग्लोरिअस अनसर्टन्टीज'अर्थात'क्रिकेट (Cricket) हा वैभवशाली अनिश्चिततेचा खेळ आहे, असं म्हटलं जातं. कारण या खेळात कशाचाच अंदाज बांधता येत नाही आणि कोणतीच गृहितकं मांडता येत नाहीत. बॅट्समन, बॉलर, विकेट कीपर किंवा फिल्डर यांच्यापैकी कोण कधी कोणती करामत करून चित्र पालटू शकेल,याबद्दल कोणीच आधी काही सांगू शकत नाही. न्यूझीलंड आणि बांग्लादेश (New Zealand vs Bangladesh) यांच्यादरम्यान झालेल्या दुसऱ्या वनडे (ODI) सामन्यादरम्यान याची प्रचिती आली. न्यूझीलंडमध्ये क्राईस्टचर्चच्या स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा ऑलराऊंडर जिमी निशमने (Jimmy Nisham)बांगलादेशचा ओपनर तमीम इक्बालला (Tamim Iqbal)आश्चर्यकारक पद्धतीने रन आऊट केलं. 108 बॉलमध्ये 78 रन करून तो आऊट झाला.

टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असलेली बांग्लादेशची (Bangladesh)टीम दोन विकेट गमावून 130 रनवर खेळत होती. तमीम इक्बाल आणि मुश्फिकुर रहीम क्रीझवर होते. 31व्या ओव्हरमध्ये रहीमने आपल्या बॅटने बॉलला हलका स्पर्श करून टोलवलं आणि तो एक रन घेण्यासाठी धावला. तमीम ज्या दिशेने धावला, त्याच दिशेला क्रीझमध्येच बॉल होता. दुसऱ्या बाजूने निशम धावत आला आणि त्याने डाव्या पायाने बॉल स्टम्पच्या दिशेने ढकलला. त्याचा नेम बरोबर बसला. त्यामुळे स्टम्प उडाले आणि तमीम क्रिजमध्ये पोहोचू शकला नाही. त्यामुळे न्यूझीलंडला तिसरी विकेट मिळाली. अशापद्धतीने आऊट झाल्यामुळे तमीम नाराज झाला.

त्याआधीही याच सामन्यात तमीम इक्बाल कॅच सुटल्यामुळे थोडक्यात बचावला होता. तो आउट नसल्याचं थर्ड अंपायनी सांगितलं होतं, तेव्हा तमीम 34 रनवर खेळत होता. 15वी ओव्हर चालू असताना फास्ट बॉलर काइल जेमीसनचा बॉल टोलवून तमीमने त्याच्याच हातात कॅच दिला होता. मात्र कॅच पकडत असताना जेमीसन पडला आणि त्याचा हात जमिनीला लागला. मैदानातल्या अंपायरनी तमीमला आऊट दिलं;पण तमीमने थर्ड अंपायरची मागणी केल्यानंतर त्याला नॉट आऊट देण्यात आलं.

यानंतर तमीमने आपलं अर्धशतक झळकावलं. 108 बॉलमध्ये त्याने केलेल्या 78 रनमध्ये 11 फोरचा समावेश होता. त्याच्या खेळीच्या जोरावर बांग्लादेश सहा विकेटच्या बदल्यात 271 रन बनवू शकला. तमीम व्यतिरिक्त मोहम्मद मिथुनने 57 बॉलमध्ये 6 फोर आणि 2 सिक्स मदतीने नाबाद 32 रनची खेळी केली. त्याव्यतिरिक्त मुश्फिकुर रहीमने  34,तर सौम्या सरकारने 32 रनचं योगदान दिलं. आधीच्या सामन्याच्या तुलनेत बांग्लादेशने या मॅचमध्ये सरस कामगिरी केली. पहिल्या सामन्यात बांग्लादेश फक्त 131 रनच बनवू शकला होता आणि त्यांचा आठ गडी राखून पराभव झाला होता.

First published: March 23, 2021, 11:06 PM IST

ताज्या बातम्या