News18 Lokmat

पंतप्रधानपदावर असताना 'आई' होणाऱ्या या आहेत दोन नेत्या

न्यूझिलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन आई झाल्या आहेत. त्यांना मुलगी झाली असून तसा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पंतप्रधानपदावर असताना आई होणाऱ्या त्या दुसऱ्या नेत्या ठरल्या आहेत.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2018 09:44 PM IST

पंतप्रधानपदावर असताना 'आई' होणाऱ्या या आहेत दोन नेत्या

वेलिंग्टन,ता.21 जून : न्यूझिलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन आई झाल्या आहेत. त्यांना मुलगी झाली असून तसा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पंतप्रधानपदावर असताना आई होणाऱ्या त्या दुसऱ्या नेत्या ठरल्या आहेत.

37 वर्षांच्या जॅसिंडा ऑर्डन यांनी सहा आढवड्यांची मॅटर्निटी लिव्ह घेतली असून उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स हे प्रभारी पंतप्रधान म्हणून कार्यभार बघत आहेत.सर्व जगभरातून मिळत असलेल्या शुभेच्छांमुळे भारावून गेल्याचं ऑर्डन यांनी म्हटलं आहे.

इतर पालकांसारखच आम्हीही एका वेगळ्या आनंदाचा अनुभव घेत आहोत. सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवादही त्यांनी व्यक्त केले आहेत. या आधी 1990 मध्ये बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान असताना त्या आई बनल्या होत्या. त्यांनाही मुलगी झाली होती. पंतप्रधानपदावर असताना आई झालेल्या त्या जगातल्या पहिल्याच नेत्या होत्या.

देशाचं प्रमुखपद भूषवत असताना घर आणि ऑफिस सांभाळत काम करणं हे तारेवरची कसरत असतं मात्र या नेत्यांनी तेवढ्याच सक्षमपणे देशाचा कारभार चालवत असताना आपलं आईपणही जपत आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत.

Loading...

हेही वाचा...

उद्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी, कापडी पिशवी बाळगायला विसरू नका!

प्लास्टिकबंदीत अमृता फडणवीस आमच्यासोबत,मुख्यमंत्र्यांचा दबावाच्या प्रश्नच नाही-रामदास कदम

'या' प्लास्टिकवर बंदी नाही!

VIDEO - बंदीबद्दल काय म्हणतायत प्लास्टिक विक्रेते?

VIDEO : सर,आम्हाला सोडून जाऊ नका!,डोळ्यात पाणी आणणारा एक ह्रदयस्पर्शी निरोप सोहळा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2018 09:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...