Good News! समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी हलणार पाळणा

Good News! समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी हलणार पाळणा

2017मध्ये न्यूझीलंड महिला संघाची कर्णधार अ‍ॅमीने संघातील सहकारी ली ताहूहूशी विवाह केला.

  • Share this:

बर्मिंगहॅम, 20 ऑगस्ट : न्यूझीलंड महिला संघाची कर्णधार अ‍ॅमी सॅटर्थवेटननं क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेतली आहे. याचे कारण आता अखेर समोर आले आहे. मंगळवारी न्यूझीलंड संघाची कर्णधार अ‍ॅमीनं ती गर्भवती असल्याची घोषणा केली आहे. यातच अ‍ॅमीला न्यूझीलंडच्या नियमांनुसार मॅटरनिटी लिव्ह मिळणार आहे. अ‍ॅमीनं जानेवारी 2020मध्ये आपल्या घरी लहान पाहुणा येणार असल्याचे तिनं सोशल मीडियावर जाहीर केले.

मार्च 2017मध्ये अ‍ॅमीने संघातील सहकारी ली ताहूहूशी विवाह केला. 2014मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. आता गर्भवती असल्यामुळे अ‍ॅमीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. त्यानंतर 2021मध्ये होणाऱ्या महिलांच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतून ती संघात पुनरागमन करणार आहे. पण, तिला 2020मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागणार आहे.

दरम्यान अ‍ॅमीनं सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करत, ,''ली आणि मी आम्हा दोघींनाही ही बातमी तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे. मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही”, असा आनंद व्यक्त केला. तसेच लीचेही विशेष आभार मानले. अ‍ॅमी आणि ली लग्नाआधी आठ वर्ष एकमेकांसोबत होते, मात्र घरच्यांची परवानगी न मिळाल्यामुळं त्यांना लवकर विवाह करता आला आहे. मात्र न्यूझीलंडच्या संघानं या दोघांचेही खुल्या मनाने स्वागत केले.

वाचा-माही इज बॅक! लष्करातून परतल्यानंतर धोनीचा कडक लुक

वाचा-चाहत्यांच्या संतापानंतर अख्तरची बिनशर्त माघार, म्हणाला...

मॅटरनिटी लिव्ह घेणारी अ‍ॅमी पहिलीच खेळाडू

न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या सेंट्रल करारात वाढ मिळाली होती. तसेच मंडळाने गर्भवती खेळाडूंसाठी मॅटरनिटी लिव्ह मान्य केली होती आणि त्याचा लाभ मिळणारी अ‍ॅमी पहिलीच खेळाडू ठरली. या जोडप्यातील सॅथर्थवेट ही 2017 ची आयसीसी 'प्लेयर ऑफ दी इयर'सुद्धा होती. 2016-17 च्या मोसमात तिने वन डे सामन्यांमध्ये लागोपाठ चार शतके करण्याचा विक्रम केला आहे तर ली ताहूहू ही महिला क्रिकेटमधील सर्वात जलद गोलंदाजांमध्ये गणली जाते.

वाचा-ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन करणारा खेळाडू आता सनरायझर्स हैदराबादला करणार मार्गदर्शन

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lesbian
First Published: Aug 20, 2019 03:45 PM IST

ताज्या बातम्या