मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पदार्पणातच भारताविरुद्ध शतक ठोकणाऱ्या दिग्गज खेळाडूच निधन, क्रिकेट बोर्डाने वाहिली श्रद्धांजली

पदार्पणातच भारताविरुद्ध शतक ठोकणाऱ्या दिग्गज खेळाडूच निधन, क्रिकेट बोर्डाने वाहिली श्रद्धांजली

या खेळाडूने भारताविरुद्ध पदार्पणात अविस्मरणीय खेळी करत 105 धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना भारताच्या 5 खेळाडूंना तंबूत पाठवलं होतं.

या खेळाडूने भारताविरुद्ध पदार्पणात अविस्मरणीय खेळी करत 105 धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना भारताच्या 5 खेळाडूंना तंबूत पाठवलं होतं.

या खेळाडूने भारताविरुद्ध पदार्पणात अविस्मरणीय खेळी करत 105 धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना भारताच्या 5 खेळाडूंना तंबूत पाठवलं होतं.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 07 फेब्रुवारी: न्युझीलॅंड (New Zealand) क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू ब्रूस टेलर (Bruse Taylor) यांचा 77 व्या वर्षी दुःखद निधन (Death) झालं आहे. ब्रूसने 1965 साली भारताविरुद्ध (India) कसोटी पदार्पण (Test Match Debut) केलं होतं. ब्रूसने पदार्पणातच भारताविरुद्ध शतक (Century) झळकावलं होतं. एवढंच नव्हे तर त्याने गोलंदाजी करताना भारताचे पाच गडीही (5 Wickets) बाद केले होते. ब्रूस टेलरच्या याच कामगिरीमुळे हा सामना अविस्मरणीय ठरला होता. ब्रूसने ही कामगिरी कोलकत्यातील ईडन गार्डनच्या मैदानावर केली होती. शनिवारी 6 फेब्रुवारी रोजी न्युझीलॅंड या माजी अष्टपैलू खेळाडूच निधन झालं आहे. भारताविरुद्ध पदार्पणातच ठोकलं शतक 77 वर्षांच्या ब्रूस टेलर यांनी काल जगाचा निरोप घेतला आहे. याची माहिती न्युझीलॅंड क्रिकेट बोर्डानं दिली. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पण भारताविरुद्ध शतक करण्यापूर्वी ब्रूस टेलर यांनी प्रथम श्रेणीत देखील शतक केलं नव्हतं. पण भारताविरुद्ध 8 व्या क्रमांकावर उतरून ब्रूस टेलर यांनी 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने शतकाला गवसणी घातली होती. त्यामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक झालं होतं. 105 धावांची धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर ब्रूस टेलर यांनी गोलंदाजी करताना 86 धावांच्य बदल्यात भारताचे 5 गडी बाद केले होते. तथापि, दुसऱ्या डावात खेळण्याची संधी त्यांना मिळाली नव्हती. दुसऱ्या डावात एकाही चेंडूचा सामना न करता त्यांना माघारी परतावं लागलं होतं. खरंतर हा सामना अनिर्णित राहिला होता. मात्र या सामन्याने ब्रूस टेलरला एक वेगळी ओळख दिली होती. त्यानंतर चार वर्षांनी ब्रूसने न्युझीलॅंडसाठी सर्वात जलद शतक बनवलं होतं. त्यांचा हा विक्रम तब्बल 36 वर्षे अबाधित राहिला. 36 वर्षांनंतर डॅनीयल व्हिटोरीने हा विक्रम मोडीत काढला. न्युझीलॅंड क्रिकेट बोर्डाने शोक व्यक्त केला न्युझीलॅंड क्रिकेट बोर्डाने ब्रूस टेलर यांच्या मृत्यूची माहिती देताना लिहिलं की, 'न्युझीलॅंड क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू ब्रूस टेलर यांचं 77 व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे. याचं आम्हाला अतीव दुःख झालं असून आमच्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत आणि जवळच्या मित्रांसोबत आहेत. ब्रूस टेलर यांनी 1965 ते 1973 या काळात न्युझीलॅंडसाठी एकूण 30 कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये 2 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 30 कसोटी सामन्यात त्यांनी एकूण 898 धावा केल्या होत्या. तथापि गोलंदाजी करताना त्यांनी 111 बळी आपल्या नावावर केले होते. त्यांनी न्युझीलॅंडसाठी दोन वन डे सामने देखील खेळले आहेत.
First published:

Tags: Cricket news, New zealand

पुढील बातम्या