New Year Party करायचीय? मुलींसाठी सेफ आहेत ही 5 ठिकाणं

काय मग, न्यू इयर पार्टीसाठी कुठे जाणार? फिरायला जायचा बेत असेल तर ही 5 ठिकाणं बेस्ट आहेत. इथे तुम्ही सोलो ट्रिपही करू शकता.

  • Share this:

ख्रिसमसच्या दिवसांत गोव्यामधलं सेलिब्रेशन आणखीनच रंगात येतं. इथल्या क्लबमध्ये पार्टी करायला तुम्हाला खूपच धमाल येईल. त्याशिवाय डोना पॉला, मिरामार, दूधसागर धबधबा, ओल्ड गोवा अशा ठिकाणी भेट द्या. इथे महिलांसाठी वेगळी पार्टी आयोजित केली जाते. त्यामुळे पार्टीचा आनंद बिनधास्त लुटता येतो.

डलहौसीला मिनी स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं. गुलाबी थंडीच्या दिवसांत तर इथे पर्यटनाची मौज न्यारीच असते. तुम्हाला नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी एखादं रोमँटिक ठिकाण हवं असेल तर डलहौसी हे बेस्ट ठिकाण आहे.

राजस्थानमधली काही शहरं नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एकदम झकास आहेत. यातलंच एक नगर म्हणजे उदयपूर. भारताचा इतिहास, संस्कृती, परंपरा, कला यांचा अनोखा मिलाफ इथे अनुभवता येतो. इथल्या सरोवरांच्या काठी रेंगाळणारे रमणीय क्षण तुमच्या कायम लक्षात राहतील.

तुम्हाला गोव्यापेक्षा थोडं वेगळं ठिकाण हवं असेल तर पाँडिचेरीचा हटके पर्याय आहे. समुद्रकिनाऱ्यावरच्या क्लबमध्ये नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करून बघा. हे ठिकाण तर सोलो ट्रिपसाठीही चांगलं आहे.

तुम्हाला एखाद्या शांत निवांत ठिकाणी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, कुटुंबीयांसोबत सुटी एन्जॉय करायची असेल तर कर्नाटकमधलं गोकर्ण हे समुद्राकाठचं ठिकाण फार सुंदर आहे. गोकर्णचं महाबळेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2019 09:04 PM IST

ताज्या बातम्या