PHOTO : भारत - पाक सीमेवर दाखल होणार हे अत्याधुनिक रणगाडे

भारत - पाक सीमेवर T-90 MS बनावटीचे रणगाडे दाखल होणार आहेत. या रणगाड्यांच्या खरेदीसाठी भारताने रशियाशी करार केला आहे.

  • Share this:

भारताने रशियाकडून T-90 MS बनावटीचे 464 रणगाडे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 13,500 कोटींच्या या संरक्षण व्यवहाराला परवानगी दिली आहे.

भारताकडे आधीपासूनच T-72 आणि T-55 रणगाडे आहेत. हे रणगाडेही भारत - पाक सीमेवर तैनात केले जाणार आहेत. यामुळे सीमेवर जास्त संरक्षण मिळेल.

भारताकडे सध्या T-90 हे 1650 रणगाडे आहेत. नवे रणगाडे आल्यानंतर ही संख्या 2 हजारांवर जाईल.

भारतीय सेनेत अर्जुन मार्क - 1 च्या दोन रेजिमेंट आहेत. हे रणगाडे वाळूमध्येही चालवता येतात.

भारताच्या लष्करात T-90 आणि  T-72  हे दोन प्रकारचे रणगाडे आहेत. नव्या रणगाड्यांच्या निर्मितीवरही भारतीय लष्कर काम करत आहे.

भारत जे T-90MS रणगाडे रशियाकडून खरेदी करणार आहे ते रणगाडे T-90 या प्रकारातलेच आहेत. T-90MS रणगाडे रात्रीही शत्रूवर हल्ला करण्यासाठी सक्षम आहेत.

T-90MS रणगाड्यांमध्ये हायटेक सुविधा आहेत. हे रणगाडे एका जागेहून दुसऱ्या जागी हलवणं सोपं जातं.

T-90MS रणगाड्यांमध्ये जास्त मारा करण्याची क्षमता आहे.

जगभरात भारताकडे  T-90  रणगाडे सगळ्यात जास्त आहेत. लष्करामध्ये जुने झालेले रणगाडे बदलून त्याजागी नवे रणगाडे दाखल होणार आहेत.

भारतीय रणगाड्यांचा सामना करण्यासाठी पाकिस्तानही आपली क्षमता वाढवण्यावर भर देतो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 07:27 PM IST

ताज्या बातम्या