अबब !!! 1 मिनिटात 62 पुलअप्स, पंढरपूरच्या आदर्श भोसलेचा नवा विक्रम

अबब !!! 1 मिनिटात 62 पुलअप्स, पंढरपूरच्या आदर्श भोसलेचा नवा विक्रम

पंढरपूरच्या आदर्श भोसले या युवकाने अवघ्या 1 मिनिटात तब्बल 62 पुलअप्स काढण्याचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय. त्याच्या या विक्रमाची आता गिनीज बुकात नोंद होणार आहे.

  • Share this:

20 डिसेंबर, पंढरपूर : पंढरपूरच्या आदर्श भोसले या युवकाने अवघ्या 1 मिनिटात तब्बल 62 पुलअप्स काढण्याचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय. त्याच्या या विक्रमाची आता गिनीज बुकात नोंद होणार आहे. याआधी हा रेकॉर्ड एका बल्गेरियन युवकाच्या नावावर होता त्याने एका मिनिटात 54 पुलअप्स काढले होते. पण आज पंढरपूरच्या आदर्श भोसलेने हा विक्रम मोडीत काढलाय.

या विक्रमाची नोंद गिनीज बुकात होण्यासाठी लवकरच अधिकृतपणे प्रवेशिका पाठवणार आहे. हा विक्रम करतेवेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख निखिल पिंगळे देखील आवर्जून उपस्थित होते. आदर्शने एका मिनिटात 62 पुलअप्स काढल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. या जागतिक पुलअप्स विक्रमानंतर आदर्श भोसलेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या जाहीर सत्कारही करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2017 08:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading