मुंबईमध्ये पार्किंगचे नवे नियम, या महत्त्वाच्या ठिकाणांवर आता गाडी लावता येणार नाही!

वाहतूकीच्या या बदललेल्या नियमांमुळे वर्दळीच्या रस्त्यांवर ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे नेमकी पार्किंग करायची कुठे असा महत्त्वाचा प्रश्न प्रवाशांवर आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 09:57 AM IST

मुंबईमध्ये पार्किंगचे नवे नियम, या महत्त्वाच्या ठिकाणांवर आता गाडी लावता येणार नाही!

मुंबई, 29 ऑगस्ट : वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात मुंबईला येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यावर उपाय म्हणून आता वाहतूकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. मुंबईच्या एस.व्ही रोड, गोखले रोड आणि न्यू लिंक रोड सह आणखी 5 रस्त्यांवर गाडी पार्कींग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर आता गाडी पार्किंग करता येणार आहे.

वाहतूकीच्या या बदललेल्या नियमांमुळे वर्दळीच्या रस्त्यांवर ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे नेमकी पार्किंग करायची कुठे असा महत्त्वाचा प्रश्न प्रवाशांवर आहे. दरम्यान, या रस्त्यांवर 14 किलोमीटरचा रस्ता नो पार्कींग झोनमध्ये वळवण्यात आला आहे. त्यामुळे 14 किलोमीटरचा आता तुम्ही कुठेही गाडी पार्क करू शकतं नाही. सध्या या रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर नो पार्किंग असे फलक लावण्यात आले आहे. तर मुंबईतल्या सगळ्या बस थांब्याच्या दोन्ही बाजूला 50 मीटरपर्यंत गाडी पार्क करता येणार नाही.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये अपघात घडण्याचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे भरधाव वेगात आणि हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही वाहतूक पोलिसांनी देण्यात आले आहे. एकीकडे वाहतूकीचा मुद्दा गंभीर असताना तिकडे बेस्ट कर्मचाऱ्यांचं उपोषण काही संपण्याचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.

इतर बातम्या - 'नवसाला पावणारा आणि इच्छापूर्ती करणारा बाप्पा' अशी जाहिरात करताना सावधान...!

बेस्ट कर्चमाऱ्यांचं उपोषण 2 दिवसानंतरही सुरूच राहणार आहे. बेस्ट कर्मचारी कृती समितीचे प्रमुख शशांक राव यांनी 10 टक्के वेतनवाढ मान्य नसल्याचं सांगितलं आहे. खरंतर उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानावर बैठक झाली. यात 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात सातवा वेतन आयोगाच्या धरतीवर बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा निर्णय झाला आहे. तसंच महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणं बेस्टच्या कामगारांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Loading...

मात्र, त्यानंतरही शशांक राव यांची कामगार संघटना उपोषण सुरू ठेवण्यावर ठाम आहे. संध्याकाळी झालेल्या बैठकीला मुंबईचे महापौर, आयुक्त, बेस्टचे महाव्यवस्थापक आणि बेस्ट कामगार सेनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत बेस्ट कर्मचारी कृती समितीला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली नाही.

VIDEO: वॉशिंग मशीन आणि निरमाच्या भाजप कनेक्शनवर रावसाहेब दानवे म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2019 09:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...