उस्मानाबादेत लॉकडाउनचा नवा आदेश, व्यापारी आणि नागरिकांमध्ये उडाली खळबळ

उस्मानाबादेत लॉकडाउनचा नवा आदेश, व्यापारी आणि नागरिकांमध्ये उडाली खळबळ

उस्मानाबादमध्ये रोज नवनवीन आदेश काढण्यामुळे चर्चेत असणाऱ्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आणखी एक नवा आदेश काढला आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 12 ऑगस्ट : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उस्मानाबादमध्ये रोज नवनवीन आदेश काढण्यामुळे चर्चेत असणाऱ्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आणखी एक नवा आदेश काढला असून त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

आजपासून जिल्ह्यातील दुकाने 9 ते 3 पर्यंतच सुरू राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी काढला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, आता सकाळी 9 ते 7 पर्यंत सुरू असणारी दुकाने आता 9 ते 3 या वेळेत सुरू राहणार आहे. यात प्रामुख्याने अत्यावश्यक सेवा पुरवणारे दुकाने ही आता 3 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 3 च्या नंतर फिरण्यास ही बंदी घालण्यात आली आहे.

रुग्णसंख्या वाढत असल्याचे कारण देत हा आदेश काढला असून अत्यावश्यक सेवा सुविधा असतील किंवा मार्केट बाबत जो जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेतला आहे, त्याबद्दल अनेक व्यापारी आणि नागरिकांना नाराजी व्यक्त केली आहे.

रुग्णसंख्या वाढत असेल तर आरोग्य सेवा पुरवणाऱ्या मार्केटच्या वेळेत बदल करून नागरिक व सामान्य माणसाचे हाल करू नये, अशी व्यथा व्यापाऱ्यांनी मांडली आहे.

पण, व्यापारी आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त जरी करत असले तरी प्रशासनाने जो आदेश काढला आहे, त्याचे पालन करणे गरजेचं असून न केल्यास कायदेशीर कारवाई ला समोर जावे लागले, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Published by: sachin Salve
First published: August 12, 2020, 9:13 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading