मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पैसे द्या आणि दुसऱ्याच्या आयुष्याचे निर्णय घ्या; बाजारात येतंय नवं Mobile App

पैसे द्या आणि दुसऱ्याच्या आयुष्याचे निर्णय घ्या; बाजारात येतंय नवं Mobile App

न्यू न्यू अॅप(New New App)असं या अॅपचं नाव असून, ते अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील उद्योजक कर्टनी स्मिथ(Courtney Smith)यांचं ब्रेन चाईल्ड आहे.

न्यू न्यू अॅप(New New App)असं या अॅपचं नाव असून, ते अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील उद्योजक कर्टनी स्मिथ(Courtney Smith)यांचं ब्रेन चाईल्ड आहे.

न्यू न्यू अॅप(New New App)असं या अॅपचं नाव असून, ते अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील उद्योजक कर्टनी स्मिथ(Courtney Smith)यांचं ब्रेन चाईल्ड आहे.

नवी दिल्ली, 17 मे : दुसर्‍या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याची संधी तुम्हाला एखादं App देईल, हे सांगितलं तर खरं वाटेल का? पण असं App तयार आहे.  विचित्र वाटेल नां; पण असं घडण्यास सुरुवात झाली आहे. एका अॅपच्या माध्यमातून ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आली आहे. न्यू न्यू अॅप(New New App)असं या अॅपचं नाव असून, ते अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील उद्योजक कर्टनी स्मिथ(Courtney Smith)यांचं ब्रेन चाईल्ड आहे.  हे अ‍ॅप अद्याप बीटा अवस्थेत असून, लवकरच ते सर्वत्र उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय करतं हे App?

कॅनडातील एडमंटन इथं राहणारे लेखक ब्रँडन वोंग(Brandon Wong)जेवणासाठी काय ऑर्डर करावं या विचारात होतं. चायनीज की कोरियन... त्यांचा निर्णय होऊ शकत नव्हता. तेव्हा त्यांनी या New New App ला विचारलं. त्यांच्या फॉलोअर्सना त्यांच्यासाठी निर्णय घेण्यास सांगितलं. ज्यांना या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायचं होतं त्यांना या पोलमध्ये मतदान करण्यासाठी प्रत्येकी 3.50 युरो दिले गेले. बहुतांश लोकांनी त्यांनी कोरियन फूड ऑर्डर करावं असा निर्णय दिला होता. वोंग यांनी लोकांच्या सल्ल्यानुसार फूड ऑर्डर केलं.

Dogecoin ची कमाल! 33 वर्षीय तरुणाने अवघ्या 4 महिन्यात कमावले कोट्यवधी

ठराविक दिवशी कपडे कोणते घालावेत यासारख्या अनेक गोष्टींसाठी या अ‍ॅपद्वारे लोकांची मदत घेतली. त्यामुळे मला निर्णय घेणं खूप सोपं गेलं, असं ते सांगतात. "मार्चमध्ये मी हे अ‍ॅप वापरायला सुरुवात केली. आता मी आठवड्यातून तीन किंवा चार वेळा पोस्ट करतो. आतापर्यंत मी एकूण 1700 हून अधिक मतं घेतली आहेत," असं वोंग यांनी सांगितलं.

वोंग यांच्या उदाहरणावरून हे अ‍ॅप कसं काम करणार आहे याची सहज कल्पना येते. लेखक, चित्रकार, संगीतकार, फॅशन डिझायनर्स, ब्लॉगर्स अशा गटातील लोक हा या अ‍ॅपचा मुख्य ग्राहकवर्ग आहे. त्यांना क्रिएटर्स असं संबोधण्यात आलं आहे. या लोकांना आपल्या चाहत्यांशी किंवा फॉलोअर्सशी इतर सोशल मीडियापेक्षा अधिक जवळून संपर्क साधण्यासाठी आणि त्यातून आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशानं हे अ‍ॅप डिझाइन करण्यात आलं आहे.

फ्लिपकार्टचा आपला पासवर्ड तातडीने करा रिसेट; अन्यथा बसेल मोठा धक्का

ज्यावेळी कोणीही क्रिएटर आपला प्रश्न आणि त्याच्या उत्तरासाठी दोन पर्याय आपल्या फॉलोअर्ससमोर मांडेल तेव्हा पैसे देऊन लोक मतदान करतील. ते हवे तितक्या वेळा पैसे देऊन मत नोंदवू शकतील.मत दिले जाते तेव्हाक्रिएटरलान्यू न्यूतर्फेकमिशन मिळते. दोन महिन्यांपूर्वीसादरझालेल्यायाअ‍ॅपवर सध्या 100पेक्षा कमीक्रिएटर्स(Creators)आहेत.

या अ‍ॅपच्या सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी 33वर्षीय मिस स्मिथ यांनी या न्यू न्यू अ‍ॅपसाठी मोठ्या योजना आखल्या असून, अनेक बडे गुंतवणूकदार यात पैसे लावण्यास सज्ज आहेत." न्यू न्यू दोन मार्गांनीफायदा मिळवून देते. अवघ्या पाच डॉलर्समध्ये ते मजाकरण्याची आणिबक्षीस मिळवण्याचीही संधी मिळवून देते", असं मिस स्मिथ यांनी स्पष्ट केलं.

मोबाइलवर गेम खेळता? मग ही बातमी वाचाच

बिझिनेस सायकॉलॉजिस्ट स्टुअर्ट डफ यांना या अ‍ॅपची संकल्पना मजेदार वाटते आणि यामुळे क्रिएटर आणि त्यांचे फॉलोअर्स यांच्यात विशेष बंध निर्माण होतील असं त्यांना वाटतं. त्या चवेळी काही बंध अयोग्यही ठरू शकतात याकडेही ते लक्ष वेधतात.

दरम्यान, मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस आणि त्याच्या कंटेंटवर बंदी आणण्याचा किंवा त्याला काढून टाकण्याचा अधिकार कंपनीला असल्याचं New New च्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं आहे.

टोरांटोचा 34 वर्षीय अँड्रे पॅट्रिक नुकताच न्यू न्यू वर त्याच्या आवडत्या व्हिडिओ स्ट्रीमरशी संवाद साधण्याच्या उद्देशानं सहभागी झाला आहे. एखाद्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा किंबहुना सहसा सगळ्यांसमोर न येणारे त्याचे वेगळे पैलू जाणून घेण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे, असं मत त्यानं व्यक्त केलं आहे.

भविष्यात हे अ‍ॅप सोशल मीडियावर धमाकाही करू शकेल. कदाचित आपल्यासारखे लाखो लोक आपल्या आवडत्या लेखकानं किंवा संगीतकारानं डिनरमध्ये काय घ्यावं यासाठी मतदान करत असतील. अर्थात हे आपल्यावरच अवलंबून आहे.

First published:

Tags: Mobile app