S M L

पनामा पेपर्स लीकमध्ये पुन्हा भारतीय उद्योजक अडकले

2016 मध्ये पनामा पेपर्स छापण्यापूर्वी 3 आठवडे आगोदर पनामाची लॉफर्म मोसैक फोनसेकाला पाठवलेल्या मेलमध्ये काही भारतीयांची नावे समोर आली आहेत.

Sachin Salve | Updated On: Jun 21, 2018 10:23 PM IST

पनामा पेपर्स लीकमध्ये पुन्हा भारतीय उद्योजक अडकले

नवी दिल्ली, 21 जून : जगभर खळबळ उडवून देणाऱ्या पनामा पेपर्स लिक प्रकरणात आता पुन्हा भारतीय उद्योजकांची नावं समोर आलीये.  यामध्ये पीव्हीआर सिनेमाचे मालक अजय बिजली, सुनिल मित्तल यांचा मुलगा आणि हाईक मेसेंजरचे सीईओ कवीन भारती मित्तल, एशियन पेन्टसचे प्रवर्तक अश्विन धनी यांचा मुलगा जलज अश्विन धनी याच्या नावाचा समावेश आहे.

इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तामध्ये ही माहिती देण्यात आलीये. या वृत्तानुसार ज्यांची यात नावं आली आहे. त्यांनी परदेशात काळा पैसा दडवल्याचा आरोप आहे.

यात केबीएम ग्लोबल लिमिटेटचे प्रवर्तक कवीन भारती मित्‍तल यांचाही समावेश आहे.  केबीएम ग्‍लोबल लिमिटेड ब्रिटिश वर्जन आइलंड (BVI) मध्ये डिसेंबर 2008 में रजिस्टर केली होती.

VIDEO : डॉक्टराची क्रूरता ; 9 परदेशी कुत्रे भुकेपोटी आपलीच खात होते विष्ठा !

2016 मध्ये पनामा पेपर्स छापण्यापूर्वी 3 आठवडे आगोदर पनामाची लॉफर्म मोसैक फोनसेकाला पाठवलेल्या मेलमध्ये काही भारतीयांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये पीवीआर सिनेमाचे मालक अजय बिजली सुनिल मित्तल यांचा मुलगा आणि हाईक मेसेंजरचे सीईओ कवीन भारती मित्तल, एशियन पेन्टसचे प्रवर्तक अश्विन धनी यांचा मुलगा जलज अश्विन धनी याच्या नावाचा समावेश आहे.

Loading...
Loading...

या सर्व उद्योजकांच्या परदेशात कंपन्या आहेत. मोसैक या विषयावर अधिक अभ्यास करत आहे.

याआधीही भारतीयांची नावं

- अमिताभ बच्चन

- शिव विक्रम खेमका- सन ग्रुपचे प्रमुख नंदलाल खेमका यांचा मुलगा

- जहांगीर सोराबजी - माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचा मुलगा

- केपी सिंह -डीएलएफ समुहाचे प्रमुख

- अनुराग केजरीवाल- लोकसत्ता पक्षाचे माजी नेता

- नवीन मेहरा- मेहरासन्स ज्वेलर्सचे मालक

- हाजरा इकबाल मेमन- अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीची पत्नी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2018 10:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close