नवी मुंबई,ता.5 जुलै: नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6A इथले व्यावसाईक शांताराम कुटाळ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गोळ्या झाडल्यावर त्यांच्यावर चाकूने वार देखील करण्यात आले. कुटाळ यांचा गाड्यांच्या बॅटरी विकण्याचा व्यावसाय आहे. रात्री १० वाजता राहत्या घराखाली ते आले असता त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडून नंतर पुन्हा चाकूने भोसकून त्यांची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली.
ही हत्या व्यावसाईक कारणावरून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज कोमोठे पोलीसांनी व्यक्त केलाय. ही घटना समोरच्या इमारतीच्या cctv मध्ये कैद झाली असून हत्येची अतिशय धक्कादायक दृश्य यामध्ये दिसत आहेत. कुटाळ यांच्यावर चाकुने वार होत असताना समोरच्या रस्त्यावरून वाहतुकही सुरू असून माणसांची ये जा होत असल्याचंही सीसीटीव्ही फुटेज मधून स्पष्ट होतं. मात्र त्यांच्या मदतीला कुणीही धावून आलेलं नाही. वेळीच कुणी त्यांच्या मदतीला आलं असतं तर कुटाळे यांचा जीव वाचू शकला असता.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. कुटाळे यांच्या फोन डिटेल्सलरूनही माहिती घेण्यात येत असून त्यांचं काही भांडण होतं का तेही तापासून पाहिलं जातं आहे. रात्री 10 ची ही घटना भर रस्त्यात घडली असल्याने पोलिसांच्या क्षमतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून व्यापाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकार वाढत असून चिंतेचं वातावरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv visuals, Murder, New mumbai, Police, नवी मुंबई, पोलीस, सीसीटीव्ही, हत्या