नवीन मोटर वाहन कायदा रस्ता सुरक्षेबाबतच्या #चलताहै वृत्तीला आळा घालेल

नवीन मोटर वाहन कायदा रस्ता सुरक्षेबाबतच्या #चलताहै वृत्तीला आळा घालेल

आपण जर रोमियो सारखे रस्त्यावर चुकीच्या दिशेने गाड़ी चालवत असाल तर, हा सप्टेंबर महिना आपल्यासाठी सुधारण्याचा महिना आहे. अंधाधुंध ड्रायव्हिंगपासून मुक्ती का मिळवावी?

  • Share this:

आपण जर रोमियो सारखे रस्त्यावर चुकीच्या दिशेने गाड़ी चालवत असाल तर, हा सप्टेंबर महिना आपल्यासाठी सुधारण्याचा महिना आहे. अंधाधुंध ड्रायव्हिंगपासून मुक्ती का मिळवावी? इतरांना दुखापतीपासून वाचविणे हे कारण आपल्यात सुधारणा घडविण्यास पुरेसे नसेल तर कदाचित आपल्या मध्ये दंड नियमांमुळेच बदल घडू शकतों. 1 सप्टेंबरपासून लागू झालेल्या मोटार वाहन कायद्यात बदल करण्यात आला आहे, ज्यात दोषी व्यक्तिसाठी दंड आणि भुर्दंड वाढविण्यात आला आहे. पुढे अपण याची झलक / सारांश पाहूया.

परवान्याशिवाय वाहन चालविणे

आपण आपले पाकीट घरी सोडले असेल किंवा आपला परवाना 20 वर्षां नंतर नूतनिकरण करण्यास विसरला असेल, तर त्यासाठी आता दंड रुपये  500 न रहता ह्या गैरवर्तना साठी आपल्याला विना परवाना अंतर्गत रुपये 5,000  भुर्दंड भरावा लागणार आहे.

via GIPHY

रेसिंग आणि वेग

द फ़ास्ट एंड फुरियस मालिकेच्या चाहत्यांना अतिवेगाने गाड़ी चलविण्या अंतर्गत रुपये 10,000 दंडा सहित एक महिन्यापर्यंतचा तुरूंगवास घडू शकतो. कित्येक महिन्यांसाठी आपले डिझेलचे पैसे भरण्या इतपत तरी हा दंड आहे.

via GIPHY

धोकादायक ड्रायव्हिंग

आपल्या मित्रांसह रायडिंग चा आनंद घेताय? या सर्व मजेच्या दरम्यान आपण आपले लक्ष रस्त्यावर सुनिश्चित करा. धोकादायक पद्धतिने वाहन चालविण्याच्या आरोपाखाली आता सहा महिन्यांपासून ते एक वर्षाची शिक्षा ठोठावली जाते आणि दंडही रू. 1,000 ते रू. 5,000 आहे. आणि हा पहिला गुन्हा मानला जातो पण दुसऱ्यांदा पकडल्या गेल्यास दोन वर्षापर्यंत तुरूंगवासाची शिक्षा आणि 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

via GIPHY

दारूच्या नशेत वाहन चालविणे

झिंगलेला असणे एक मूर्खपणाची बाब असू शकते परंतु मद्यधुंद होऊन वाहन चालविणे ही हसण्याजोगे बाब नाही. आपणास फक्त घरी जाण्याकरिता टॅक्सीसाठी खर्च करायचा आहे. अन्यथा दारू पिऊन गाडी चलविन्या अंतर्गत पहिल्या गुन्ह्यास सहा महिन्यांच्या तुरूंगवासासह रुपये 10,000 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल, आणि दुसऱ्या खेपेस ही शिक्षा दोनवर्षापर्यंतचा तुरूंगवास व दंड रुपये 15,000 आहे.

via GIPHY

वाहतुकी मध्ये अडथळा निर्माण करणे

एक भारतीय म्हणून, रागाच्या भरात रस्त्याच्या मधोमध एक देखावा करणे हा मानवाधिकार मानला जाऊ शकतो आणि त्या साठी फक्त पन्नास रुपये दंड आहे, जे एक उत्कृष्ट व्हीएफएम आहे. पण आता रस्त्याच्या माधोमाध गाडी थांबवून दंगा केल्यास आपणास रुपये 500 दंड पडेल.

via GIPHY

विमा न उतरवलेले वाहन चालविणे

पुन्हा आपला विमा प्रीमियम विसरलात? आतापासून, विमेशिवाय वाहन चालविणे तुम्हाला तीन महिन्यांपर्यंत तुरूंगात डांबून ठेवू शकतो आणि सुमारे रु. 2,000 पर्यंत दंड ठोठवाला जाऊ शकतो. पुन्हा पुन्हा गुन्हा झाल्यास तीन महिन्यांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. आणि दंड रु.4,000 पर्यंत बसु शकतो.

via GIPHY

विशिष्ट दंडाचा उल्लेख न केलेल्या, गुन्ह्यांसाठी दंड

आपण काय चूक केली हे माहित नाही? तुम्हाला दंड देताना नक्कीच रहदारी पोलिसांना सांगू द्या. पूर्वी काय होते, पहिल्या गुन्ह्यासाठी रु. 100 दंड आणि मालिका अपराधांसाठी रुपये 300 दंड होता, आता अनुक्रमे रु. 500 आणि रु 1,500 इतका दंड आहे.

via GIPHY

रस्ता नियमांचे उल्लंघन

रस्त्यावर आपली नजर चोख असणे हे अतिशय चांगले. कोणत्याही रस्ता नियमांचे उल्लंघन केल्यास आपल्याला आता रु. 500 ते रू. 1,000 रुपये दंड भरावा लागेल.

via GIPHY

विना तिकीट प्रवास

काहीतरी सापडत नाही? सबब सांगण्यात काही अर्थ नाही. आता विना तिकिटासाठी रुपये 500 दंड भरावा लागेल. जो आपण पूर्वी भरत असलेल्या दंडा पेक्षा आता रुपये 300 अधिक आहे.

प्राधिकरणाच्या आदेशाचे उल्लंघन आणि माहिती सामायिक करण्यास नकार

आतापासून, ट्रॅफिक पोलिसांठी उलट उत्तर दिल्यास तुम्हाला 2,000 रुपये इतकी किंमत मोजावी लागेल. एवढी किंमत ओढवण्यापेक्षा तोंड बंद ठेवणे हेच योग्य राहील.

via GIPHY

परवान्याशिवाय वाहनांचा अनधिकृत वापर

बरं, तुम्हाला अधिक माहिती असायला हवी, परंतु, जर तुम्ही तसे केले नाही तर सावधगिरी बाळगा कारण दंड हा रू. 1000 पासून तब्बल रु. 5,000 पर्यंत बसु शकेल.

via GIPHY

अपात्र असूनही वाहन चालविणे

आपण जर अलीकडेच वाहतूक पोलिसां बरोबर अडचणीत असाल आणि वाहन चालविण्यास अपात्र ठरल्यास, पकडले गेल्यास आपल्याला रु. 10,000 इतका भूर्दंड भरावा लागेल.

via GIPHY

जास्त वेगमर्यादा

जिथे आधीचा दंड फक्त रु. 400  होता, आता तिथे वाहन मर्यादेपेक्षा वेगवान केल्यावर हजारोंमध्ये दंड आकारला जात आहे. जो हलक्या मोटारीसाठी रु. 1000 पासून 2000 पर्यंत आहे. तर मध्यम वजनाच्या वाहनांसाठी ( मिनी बस etc) किंवा माल वाहकांसाठी रु.2000 पासून रु. 4000 हजार पर्यंत आहे आणि पुढील गुन्ह्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना जप्त करण्यात येणार आहे.

via GIPHY

मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या वाहन चालविण्यास अक्षम असताना वाहन चालविणे

जे वाहन चालविण्यासाठी अक्षम असतात, परंतु तरीही चलवितात त्यांना त्यांच्याकडून पहिल्या गुन्ह्यासाठी रु 1,000 इतका दंड आकारला जाईल आणि पुनरावृत्ती केल्यास रु. 2000 इतका दंड आकारला जाईल.

via GIPHY

अपघात संबंधित गुन्हे

जर आपण आज्ञा मोडणारे असाल आणि एखादी दुर्घटने साठी कारणीभूत असल्यास आपण जेलमध्ये जाऊ शकता. शिक्षा ही सहा महिन्यांपर्यंतची असू शकते आणि तुम्हाला तुमच्या पहिल्या गुन्ह्यासाठी रु. 5000 पर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. त्यानंतरच्या गुन्हा घडल्यास आपल्याला एक वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि दंड हा रु 10,000 पर्यंत भरावा लागू शकतो.

via GIPHY

कायदेशीर प्राधिकरणाशिवाय वाहन घेणे आणि मोटार वाहन जप्त करणे

सुरवातीला गुन्ह्यासाठी,  योग्य परवानग्याशिवाय गाडी चलविण्यासाठी तुम्हाला अतिशय कमी असा रु 500 इतका दंड भरावा लागत होता, पण आता सप्टेंबर पासून तुम्हाला आता रु. 5,000 इतका दंड भरावा लागणार आहे.

via GIPHY

बॅकसीटच्या प्रवाश्यांसाठी आता सीटबेल्ट घालणे अनिवार्य आहे

कारमध्ये असताना आपल्या शेजारी बसणाऱ्या प्रवाश्याला सीटबेल्ट अनिवार्य आहेच पण त्याच प्रमाणे पाठी बसणाऱ्या प्रवाशांनाही (ज्यांचे वय 14 किंवा 14 पेक्षा अधिक आहे) सीटबेल्ट घालावा लागणार आहे  असे न केल्यास रु. 1000 इतका दंड भरावा लागू शकतो.

via GIPHY

रस्त्यांची स्थिती आणि भारतातील चालक-वाहनचालकांची वृत्ती लक्षात घेता, नवीन मोटार वाहन कायदा #रोड टु सेफ्टी कडे जाण हे बहुसंख्य प्रवाश्यांसाठी स्वागतार्ह बदल घडवून आणत आहे. तरीही, रस्त्यावर सावधगिरी बाळगणे, म्हणजे पकडले जाणे आणि दंड होण्याच्या भीतीने नियम न पाळणे असे नाही, तर हे अपघात टाळण्यासाठी आणि प्रवाशांसाठी आणि पादचा-यांसाठी रस्त्यांनवर एक सुरक्षित स्थान बनविण्याबद्दल आहे.

ही भागीदारीची पोस्ट आहे. / ही भागीदारीची जाहिरात आहे.

रस्ते सुरक्षेच्या नियमांचे नेहमी पालन करणे आपली तसेच इतरांची सलमाती देखील महत्वाचे आहे. #Roadtosafety प्रतिज्ञा उपक्रमाचा भाग होण्यासाठी येथे क्लिक करा #JoinThePack आणि कधीही #DrinkandDrive ना करण्याचे  वचन घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2019 09:59 PM IST

ताज्या बातम्या