जीएसटीमुळे 'या' नोकऱ्यांमध्ये आहे संधी

जीएसटीमुळे 'या' नोकऱ्यांमध्ये आहे संधी

कॉमर्स पदवीधरांना जीएसटी निश्चितच दिलासा देणारा आहे. कारण जीएसटीमुळं त्यांच्यासाठी काही नवीन संधी उपलब्ध होणार आहे .

  • Share this:

27 जून: 1 जुलैपासून देशभर लागू होणाऱ्या जीएसटीमुळे संभ्रमाच वातावरण असंल तरी कॉमर्स  पदवीधरांना जीएसटी निश्चितच दिलासा देणारा आहे. कारण जीएसटीमुळं त्यांच्यासाठी काही नवीन संधी उपलब्ध होणार आहे .

जीएसटी प्रॅक्टिशनर

आता हे कॉमर्स ग्रेज्युएट जीएसटी प्रॅक्टिशनर होऊ शकतात . जीएसटी अंतर्गत प्रत्येक टॅक्स पेयरला वर्षाकाठी 37 रिटर्न फाईल करावे लागतील. या हिशोबाने देशभरात एका वर्षात 29.6 कोटी रिटर्न फाईल होतील.प्रत्येक रिटर्नची फी 250रूपये असेल . अशा वेळी वर्षभरात 7400 कोटी चा रेव्हीन्यू जमा होईल .मग अशा परिस्थितीत रिटर्न फाईल करणाऱ्या जीएसटी प्रॅक्टिशनरची नोकरी कॉमर्स पदवीधर करू शकतात.

यासाठी जीएसटी प्रॅक्टिशनरला  जीएसटी पीसीटी 1 फॉर्म आधी भरावा लागेल.त्यानंतर सरकारी अधिकारी तो फॉर्म चाचपून योग्यता पाहून जीएसटी पीसीटी2 सर्टिफीकेट इश्यू करेल .

मग सरकारनं या पदासाठी घेतलेली परीक्षा द्यावी लागेल .ही परीक्षा पास करायला जीएसटीचे उत्तम ज्ञान असावं लागेल .ती परीक्षा पास केल्यावर जीएसटी प्रॅक्टिशनर होता येईल.

फायनॅनशियल अकाउटंट

जीएसटीमुळं 80लाख लोकांचा टॅक्स बेस असेल त्यामुळे टॅक्स कायद्याचा अभ्यास असणारे आणि अकाउंटिंग जाणणाऱ्या अकांउटंट्सची गरज पडेल . ही एक मोठी संधी आहे.

एमआयएस एक्झिक्युटिव्ह

जीएसटीमध्ये तंत्रज्ञानाचा  मोठ्या प्रमाणात वापर होईल . आकड्यांचे ज्ञान असणाऱ्या ,ए्कसेल वापरू शकणाऱ्या लोकांची गरज भासेल. यांना टाईम ते टाईम रिपोर्ट बनवावे लागतील .

यासाठी एक्झिक्युटिव्ह गरज भासेल .

या सर्व नोकऱ्यांमध्ये 35000-50000 दरमहा कमवता येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 12:26 PM IST

ताज्या बातम्या