आता काळ्या कोटमध्ये दिसणार नाहीत वकील, कोरोनामुळे बदलला ड्रेस कोड

आता काळ्या कोटमध्ये दिसणार नाहीत वकील, कोरोनामुळे बदलला ड्रेस कोड

वकील (advocate) म्हटलं की काळा कोट आणि पांढरा शर्ट ही त्यांची ओळख.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मे : काळा कोट (black gown) आणि पांढरा शर्ट (white shirt) ही वकिलांची (advocate) ओळख. प्रत्यक्षात कोर्टात गेलो नसलो तरी टीव्हीवर आपण वकिलांना या ड्रेसमध्ये पाहिलं आहे. मात्र कोरोनाव्हायरसच्या परिस्थिती वकिलांचा हा काळा कोट आता दिसणार नाही. कोरोनामुळे वकिलांचा ड्रेस कोड (advocate dress code) बदलणार आहे.

सरन्यायाधीश एसए बोबडे (CJI S.A. Bobde) यांनी वकिलांसाठी नवा ड्रेस कोड जारी करणार असल्याचं सांगितलं आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे सुप्रीम कोर्टात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी होते. बुधवारी सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश एस ए बोबडे यांनी सांगितलं की, वकिल आणि न्यायाधीशांसाठी नवा ड्रेस कोड जारी करणार आहे. यामध्ये काळा कोट घालण्याची गरज नाही. फक्त सफेद शर्ट आणि बँड लावणं पुरेसं आहे, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे.

हे वाचा -VIDEO : लॉकडाऊनमध्ये GYM सुरू करण्यासाठी तरुणांनी रस्त्यावर उतरत केलं आंदोलन

सरन्यायाधीशांनी सांगितलं कोटामुळे कोरोनाव्हायरसची लागण होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे नवीन ड्रेसकोड जारी केला जात आहे. आज झालेल्या सुनावणीतही न्यायाधीशांनी काळा कोट घातला नव्हता. हा ड्रेसकोड फक्त व्हिडिओ कॉन्फ्रसिंगसाठी असेल, असंही सरन्यायाधीशांनी नमूद केलं आहे.

कोरोनाव्हायरसने लोकांची जीवनशैलीच बदलून टाकली आहे. लोकं ऑफिसऐवजी घरातून काम करू लागलेत. वारंवार हात धुणं आणि स्वच्छता हा आपल्या दैनंदिन सवयीचा भाग झाला आहे. कपड्यांप्रमाणे मास्क आणि ग्लोव्हजदेखील आपण नियमित वापरू लागलोत. व्हाइट अॅपरनमध्ये दिसणारे डॉक्टर आता विशेष कोरोना सूटमध्ये दिसू लागलेत आणि आता वकिल काळ्या कोटमध्ये दिसणार नाहीत.

संपादन - प्रिया लाड

हे वाचा - एक नाईट क्लब झाला हॉटस्पॉट, पार्टीला गेलेले 700 अधिक लोक निघाले कोरोना पॉझिटिव्ह

First published: May 13, 2020, 3:59 PM IST

ताज्या बातम्या