ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी कायदेमंत्री राम जेठमलानी यांचं निधन

ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी कायदेमंत्री राम जेठमलानी यांचं निधन

ज्येष्ठ विधिज्ञ आणि खासदार राम जेठमलानी यांचं निधन झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर : ज्येष्ठ विधिज्ञ आणि खासदार राम जेठमलानी यांचं निधन झालं आहे. ते 95 वर्षांचे होते. देशातील प्रख्यात वकील म्हणून त्यांची ओळख होती. तसंच राम जेठमलानी हे भाजपकडून राज्यसभा खासदारही होते.

राम जेठमलानी यांनी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी कायद्याची डिर्गी प्राप्त केली होती. त्यानंतर नियमांमध्ये संशोधन करून वयाच्या 18 व्या वर्षी त्यांना प्रॅक्टीस करण्याची परवानगी मिळाली. जेठमलानी हे विधिज्ञ म्हणून जेवढे चर्चेत होते तेवढीच चर्चा त्यांच्या वक्तव्यांचीही होत असे.

जेठमलानी यांनी लढवलेले मोठे खटले

राम जेठमलानी यांनी त्यांच्या वकिली पेशाच्या कारकीर्दीत अनेक मोठे खटले लढले. यातील काही प्रकरणांत तर मोठा वादही झाला. कारण राम जेठमलानी यांनी काही कुख्यात गुंडांचेही खटले लढले होते. राम जेठमलानी यांनी लढवलेले मोठे खटले -

1. नानावटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार

2. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मारेकरी सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांचा खटला

3. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांचा खटला

4. हर्षद मेहता स्टॉक मार्केट घोटाळा

5. दहशतवादी अफझल गुरू

6. जेसिला लाल हत्या प्रकरण

7. मद्रास हायकोर्ट

8. 2 जी घोटाळा

9. आसाराम प्रकरण

10. बाबा रामदेव

11. लालूप्रसाद यादव

12. जनग रेड्डी

VIDEO: दुचाकीस्वारानं हिसकावली महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 09:14 AM IST

ताज्या बातम्या