कोरोनाच्या संकटात नोकरी नाही! आता घरातच सुरू करा 'हा' बिझनेस, लाखोंनी होईल कमाई

कोरोनाच्या संकटात नोकरी नाही! आता घरातच सुरू करा 'हा' बिझनेस, लाखोंनी होईल कमाई

एकीकडे देश या जीवघेण्या महामारीशी लढत आहे तर दुसरीकडे मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये लोकांच्या नोकऱ्या जात आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जून : कोरोनाच्या (Coronavirus Pandemic) या संकटात पाण्यासारख्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या. एकीकडे देश या जीवघेण्या महामारीशी लढत आहे तर दुसरीकडे मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. या सगळ्यात आम्ही तुमच्यासाठी काही सकारात्मक बाबी घेऊन आलो आहोत. ज्याने तुम्हाला काही नवीन करण्याची संधी मिळेल आणि त्यातून तुमची आर्थिक अडचणसुद्धा दूर होईल. कोरोनाच्या भीतीमुळे बाहेर जाता येत नाही. त्यामुळे घर बसल्या सुरू करता येतील अशा बिझनेस आयडीया (New Business Idea) तुम्हाला सुचवणार आहोत.

सध्या, टेरेस फार्मिंग हा या उद्योगाची जोरदार चर्चा आहे. या व्यवसायातून आपल्याला रोख पैसे मिळवण्याची चांगली संधी आहे. या उद्योगामध्ये मातीचा वापर फारसा केला जात नाही आणि वनस्पतींसाठी आवश्यक असलेलं पोषकद्रव्य पाण्याच्या मदतीनं थेट वनस्पतीच्या मुळांमध्ये पोचवलं जातं. याला हायड्रोपोनिक्स (Hydroponics) म्हणतात.

हा व्यवसाय सुरू करणाऱ्यांची आता चांगली कमाई आहे. छतावर शेती करण्याची ही कल्पना सोपी आणि कुठेही न जाता करता येते. आयआयटी पदवीधर कौस्तुभ खरे आणि साहिल पारीख यांनी या व्यवसायातून चांगली प्रगती केली आहे. या दोघांनी 'खेतीफाई' कंपनी सुरू केली. फक्त 19 हजार रुपयांमध्ये 200 वर्ग मीटरच्या छताला शेत बनवत 700 किलोपर्यंत भाज्या उगवल्या आहेत.

चांगली बातमी: महाराष्ट्रात कमी पैशांमध्ये होणार ‘COVID-19’ची टेस्ट, जाणून घ्या!

मातीशिवाय केली कमी पाण्याची शेती

या दोघांनीही एक मॉडेल तयार केलं. ज्यामध्ये माती वापरली जात नाही आणि कमीतकमी पाण्याचा वापर केला जातो. छतावरील लागवडीसाठी बेड बनवले जातात जे वॉटर-प्रूफ असतात आणि त्यामुळे पाणी गळ्याची चिंता राहत नाही.

सेंद्रिय पदार्थांनी बनलेल्या बेडमध्ये भेंडी, टोमॅटो, वांगे, मेथी, पालक, हिरव्या भाज्या आणि मिरच्या चांगल्या वाढतात. पाणी गोड असल्याने भाज्याही चवदार असतात. यामध्ये नारळाचे कवच (कोरडी साल) प्रामुख्याने घातली जाते. माती कमी असल्यामुळे छतावर वजन जास्त होत नाही आणि पाणी गळती होण्याची समस्या उद्भवत नाही.

खरंतर भल्या मोठ्या इमारतींमुळे शेती करण्यासाठी फारशी जमिन राहिली नाही. लागवडीसाठी जमीन कमी होत असल्यानं या भाज्यांची मागणी भविष्यात वाढेल, एक कुटुंब 4 फूट बाय 4 फूट चार बेड लावून भाजीपाला महिनाभर पिकवू शकतो. त्यासाठी कमी खर्च येतो आणि जास्त नफा मिळतो.

खाणीत माती खचल्यामुळे 5 जणांचा जागीच मृत्यू, ढिगाऱ्याखाली अडकले डझनभर कामगार

First published: June 13, 2020, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading