धक्कादायक! नवजात बाळाला प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फेकलं नाल्यात

धक्कादायक! नवजात बाळाला प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फेकलं नाल्यात

अंबरनाथमध्ये काळीज पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. एका नवजात बाळाल प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून नाल्यात फेकण्यात आल्याचा प्रकार अंबरनाथच्या वडोल गावात घडला आहे.

  • Share this:

अंबरनाथ, 31 डिसेंबर : अंबरनाथमध्ये काळीज पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. एका नवजात बाळाल प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून नाल्यात फेकण्यात आल्याचा प्रकार अंबरनाथच्या वडोल गावात घडला आहे.

वडोल गावातल्या एका नाल्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बाळ असल्याचा संशय गावकऱ्यांना आला. त्यामुळे त्यांनी पिशवी नाल्याबाहेर काढली तर त्यात एक नवजात बालक होतं. आईच्या काळजाची उलटी बाजू दाखवणाऱ्या या प्रकारामुळे अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बाळाला नाल्यातून बाहेर काढताच त्याला तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिकांनी लगेच बाळाला नाल्यातून काढल्यामुळे बाळाचा जीव बचावला आहे. बाळ आता सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारासंदर्भात अंबरनाथ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हे बाळ कोणाचं आहे? ते नाल्यात फेकताना कोणी व्यक्तीला पाहिलं आहे का ? याचा आता पोलीस कसून तपास करत आहेत.

एकीकडे ही घटना आहे, तर दुसरीकडे वंशाचा दिवा पाहिजे या हव्यासापोटी माजलगाव शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. 7 मुली झाल्यानंतर 8वा मुलगा झाला पण अतिरक्तस्त्रावामुळे आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार महिला व बालविकासमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडला.

मीरा रामेश्वर एखंडे (वय ३८)असं या महिलेचं नाव आहे. आठव्यांदा झालेल्या प्रसुतीवेळी अतिरक्त श्रावाने महिलेचा मृत्यू झाला. या सगळ्यात धक्कादायक म्हणजे 7 मुलींच्या पाठीवर जन्मलेल्या नवजात मुलाचाही मृत्यू झाला आहे. या सगळ्या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुलगाच हवा ही मानसिकता संपण्याचं काही नाव घेत नाही हेच या बातमीतून पुढे येतं. या सगळ्या प्रकारामुळे बेटी बचावच्या जनजागृतीवर प्रश्नचिन्ह निर्मान होतं.

VIDEO: काळजात धडकी भरवणारा लिंगाणाचा प्रवास

First published: December 31, 2018, 7:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading