मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /गोविंदाची भाची बिकीनी घालून करत होती स्टंट; गेला तोल अन् झाली ट्रोल

गोविंदाची भाची बिकीनी घालून करत होती स्टंट; गेला तोल अन् झाली ट्रोल

तिनं असाच एक अजब-गजब व्हिडीओ शेअर केला होता. मात्र या व्हिडीओमधील तिचे प्रताप पाहून उलट नेटकऱ्यांनी तिलाच ट्रोल केलं आहे. (Netizens troll Arti Singh)

तिनं असाच एक अजब-गजब व्हिडीओ शेअर केला होता. मात्र या व्हिडीओमधील तिचे प्रताप पाहून उलट नेटकऱ्यांनी तिलाच ट्रोल केलं आहे. (Netizens troll Arti Singh)

तिनं असाच एक अजब-गजब व्हिडीओ शेअर केला होता. मात्र या व्हिडीओमधील तिचे प्रताप पाहून उलट नेटकऱ्यांनी तिलाच ट्रोल केलं आहे. (Netizens troll Arti Singh)

मुंबई 23 मे: आरती सिंग (Arti Singh) ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा याची ती भाची आहे. आरती मालिकांसोबतच सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या चर्चेत असते. यावेळी देखील तिनं असाच एक अजब-गजब व्हिडीओ शेअर केला होता. मात्र या व्हिडीओमधील तिचे प्रताप पाहून उलट नेटकऱ्यांनी तिलाच ट्रोल केलं आहे. (Netizens troll Arti Singh)

आरती अलिकडेच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या मित्र-मंडळींसोबत मालदीवला गेली होती. तिथं तिनं वॉटर स्पोर्ट्सचा मनमुराद आनंद घेतला. दरम्यान जेट स्कीवर उभं राहून थोडी स्टंटगीरी दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे स्टंट मारत असताना तिचा तोल गेला अन् ती पाण्यात पडली. हा व्हिडीओ तिनं मोठ्या कौतुकानं इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र तिची ही स्टंटगीरी पाहून काही नेटकऱ्यांनी तिला उलट ट्रोल केलं. “देशात सध्या काय चाललं आहे आणि तुम्ही काय कराताय? पैसे असे वाया घालवण्यापेक्षा लोकांची मदत करण्यासाठी खर्च करा” अशा आशयांच्या प्रतिक्रिया देत तिला ट्रोल केलं जात आहे.

‘ग्लुको बिक्सिट खाऊन दिवस काढले’; का कर्जबाजारी झाली होती तेजस्विनी पंडित?

View this post on Instagram

A post shared by Arrti singh (@artisingh5)

‘मुस्लीम धर्मात मला...’; हिबानं सांगितलं revealing dresses न घालण्याचं कारण

View this post on Instagram

A post shared by Arrti singh (@artisingh5)

आरती सिंगपूर्वी असाच काहीसा प्रकार इतर कलाकारांच्या बाबतीत घडला होता. त्यांना देखील मालदीवमधील फोटो शेअर केल्यामुळं प्रेक्षकांच्या टीकेचा सामना करावा लागला होता. अखेर वाढत्या टीकेमुळं मालदीव प्रशासनानं भारतीय सेलिब्रिटींसाठी मालदीवमध्ये बंदी घातली होती. मात्र ही बंदी लवकरच उठवली जाईल अन् सेलिब्रिटी पुन्हा एकदा मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यांवर सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Viral video.