S M L

Sacred Games 2: चार एपिसोडबद्दल मोठी हिंट

नेटफ्लिक्स इंडियाने बुधवारी ट्वीट करत लिहिले की, ‘बोला अहम ब्रह्मास्मि. सहा दिवसांत सगळं काही दिसणार आहे.’

Updated On: Mar 27, 2019 08:45 PM IST

Sacred Games 2: चार एपिसोडबद्दल मोठी हिंट

मुंबई, २७ मार्च- एका आठवड्यानंतर नेटफ्लिक्सची सर्वात लोकप्रिय वेब सीरिज सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनबद्दल मोठा खुलासा होणार आहे. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्स इंडियाने १४ दिवसांमध्ये काही तरी मोठं होणार आहे, असं ट्वीट केलं होतं. आता १४ दिवस संपायला काही दिवस शिल्लक असताना नेटफ्लिक्स इंडियाने पुन्हा एक ट्वीट करत प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे.

नेटफ्लिक्स इंडियाने चार फोटोंसोबत चार नावं शेअर केली. सेक्रेड गेम्स २ च्या चार एपिसोडशी ही चार नावं जोडली जात आहेत. नेटफ्लिक्स इंडियाने बुधवारी ट्वीट करत लिहिले की, ‘बोला अहम ब्रह्मास्मि. सहा दिवसांत सगळं काही दिसणार आहे.’ शेअर केलेल्या चारही फोटोंमध्ये मंडाला डिझाइनसह चार नावांचा खुलासा केला आहे. ही चार नावं Bidalah-a-Gita, Katham Asti, Antara Mahavana आणि Unagamam अशी आहेत.

ही चारंही नावं सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनशी निगडीत आहेत हे जवळपास निश्चित आहे. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझनमध्ये आठ एपिसोड होते. यातील व्यक्तिरेखा या हिंदू पौराणिक कथा आणि व्यक्तिरेखांमधून घेतले होते. अश्वथामा, हलाहल, अतापी वतापी, ब्रह्महत्या, सारामा, प्रेतकल्प, रूद्रा आणि ययाती अशी व्यक्तिरेखांची नावं होती.


View this post on Instagram

Bolo ‘Aham Brahmasmi.' 6 din mein sab kuch dikhayi dene lagega.

A post shared by Netflix India (@netflix_in) on




Loading...

क्राइम थ्रिलरवर आधारित वेब सीरिजबद्दल प्रेक्षकांमध्ये तुफान उत्साह पाहायला मिळतो. पहिला सिझन संपल्यानंतर चाहत्यांच्या मनात दुसऱ्या सीझनचे अनेक प्रश्न उपस्थित झाले.

सेक्रेड गेम्सला फक्त भारतातच नाही तर जगभरात यश मिळालं. सेक्रेड गेम्समध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या मुख्य भूमिका होत्या. दोन्ही कलाकारांच्या सशक्त अभिनयामुळे संपूर्ण सीरिज लक्षात राहिली. कुब्रा सैतसारख्या अभिनेत्रीला या सीरिजमुळे प्रसिद्धी मिळाली.

सेक्रेड गेम्स ही वेब सीरिज विक्रम चंद्रा यांच्या कादंबरीवर आधारित आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी मिळून या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं. नवाजुद्दीनचा भाग अनुराग कश्यपने आणि सैफ अली खानचा भाग विक्रमादित्य मोटवानीने दिग्दर्शित केला होता.

VIDEO स्कूटर अपघात पाहून राहुल गांधींनी थांबवला ताफा; जखमी पत्रकाराला स्वतःच्या कारमधून नेलं रुग्णालयात


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 08:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close